बीड :- शिवसेनेची विभागणी झाली आणि शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख पद कुंडलिक खांडे यांच्याकडे देण्यात आले. मात्र कुंडलिक खांडे वारंवार गैरवर्तन करत असल्याने कधी गुटख्यात तर कधी पक्षविरोधी कामात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कुंडलिक खांडे यांचा हात असल्याचे समोर येत होते. मात्र दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये चक्क महायुती म्हणजेच पंकजा मुंडे यांना धोका देऊन बजरंग सोनवणे यांना छुपे मदत केल्याचे उघडकीस आले. पक्षविरोधी काम करून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा प्लॅन असल्याचे यावरून समजले. ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचताच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. कुंडलिक खांडे वारंवार गुटका, अवैध धंदे तसेच बेशिस्तपणा यामुळे वारंवार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये समोर येत होते. मात्र यावेळी चक्क महायुतीला धोका दिला व पुन्हा पक्षाला धोका देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा प्लॅन ऑडिओ क्लिप मुळे संपूर्ण जिल्हा वासियांच्या व राज्यातील पक्षश्रेष्ठींच्या समोर आला. यामुळे कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या एका प्रकरणामध्ये कुंडलिक खंडे यांच्यावरील 370 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचाही घटक वॉरंट कुंडलिक खांडे यांना दिनांक 29 शनिवार रोजी कुंडलिक खांडे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आले.
ऑडिओ क्लिप मुळे खांडेंचे कार्यालय फोडले गेले<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8791875739887589"
crossorigin="anonymous"></script>
<!-- Display16 -->
<ins class="adsbygoogle"
style="display:block"
data-ad-client="ca-pub-8791875739887589"
data-ad-slot="1487119365"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी महायुतीच्या विरोधात काम करून बजरंग सोनवणे महाविकास आघाडी यांना छुपे मदत केल्यामुळे महायुतीचा अल्पशामताने पराभव झाला. तसेच धनंजय मुंडे यांची गाडी फोडू, एक ठोका आणि एक दगड याने आपण विधानसभेला पन्नास हजार प्लस होऊ असेही वक्तव्य या क्लिपमध्ये करण्यात आलेले होते. याच वक्तव्याचा राग म्हणून मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचे जालना रोड बीड येथील कार्यालय फोडून टाकले.
__________________________________
Post a Comment