दिवाणी व फौजदारी न्यायालय, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा च्या परिसरात योगदिनाप्रित्यर्थ वृक्षारोपण



लोकनेता न्युज नेटवर्क

देऊळगाव राजा :- दि. २१-०६-२०२४ रोजी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालय तथा तालुका वकील संघ, दे. राजा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालय परिसरात सामूहिक वृक्षारोपण करण्यात आले. माननीय प्र. व. न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश, क. स्त. श्री. शैलेश कंठे यांच्या शुभहस्ते पहिल्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. तथा सहा. सरकारी वकील मा. अनिल शेळके, वकील संघ दे. राजाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. विजयकुमार कस्तुरे,
माजी व. संघ अध्यक्ष ॲड. नरोडे,
ज्येष्ठ ॲड. विघ्ने, ॲड. वायाळ, ॲड. इंगळे, उपाध्यक्ष ॲड. विणकर, ॲड. एडके, ॲड. रामाने, ॲड. मोरे, महिला विधिज्ञ तिडके मॅडम, विघ्ने मॅडम, खार्डे मॅडम तसेच न्यायालय अधिक्षक सातपुते, बेलीफ झिणे, कर्मचारी नागरे, केवट मॅडम इत्यादी सह बरीच वकील मंडळी तथा पोलीस अधिकारी यांनी या आजच्या काळाची ज्वलंत गरज असलेल्या, पर्यावरण संवर्धन सोहळ्यात उपस्थित राहून प्रत्येकी एक झाड लावले. याप्रसंगी - लावलेल्या प्रत्येक झाडाचे संवर्धन सुध्दा करावे - असा मौलिक संदेश मा. न्यायाधीशांनी दिला तर, आपण लावलेल्या वृक्षाचे - आपला वृक्ष - म्हणून जतन करण्याचे आर्जवी आवाहन ॲड. विजयकुमार कस्तुरे यांनी केले त्यामुळे आजच्या मुहूर्तावर रोपण केलेल्या या वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे हार्दिक अभिवचन सर्व उपस्थितांनी जाहीर केले ही अत्यंत कौतुकाची व अभिनंदनीय तसेच अविस्मरणीय बाब ठरली आहे !
__________________________________

0/Post a Comment/Comments