देऊळगाव राजा नगरीत प्रथमच संत संमेलन

योगेशभाऊ जाधव फाऊंडेशनचा उपक्रम

लोकनेता न्युज नेटवर्क

बुलढाणा (ज्ञानेश्वर बुधवत) :- महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम वारकरी संप्रदाय करते. अनेक शतक उलटून देखील वारकरी संप्रदाय हा जशास तसा कायम आहे. 
          वारंवार नवनवीन उपक्रम योगेशभाऊ जाधव फाऊंडेशन मार्फत आयोजित करतांना दिसून येते.
 अशातच फाऊंडेशने संत संमेलनाचे आयोजन केले आहे. दिनांक २३ रोजी असोला फाटा येथील शुभांगी लॉन्स येथे सकाळी १०:३० वाजता संमेलनाला सुरुवात होणार असून महाराष्ट्रातील नामांकित महाराज मंडळी उपस्थिती लावणार असून वारकऱ्यांचा सन्मान सोहळा येथे पार पडणार आहे.
      बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच हा सोहळा असून संत महंतांचे विचार ऐकण्यासाठी सर्व जन्नानी अवश्य यावे,परिसरातील किर्तनकार, विणेकरी, टाळकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, चोपदार, परमार्थप्रेमी भाविकभक्त मंडळींनी उपस्थित राहुन, या संत-महंतांच्या विचारांचा लाभ घेऊन भोजनाचाही अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती योगेशभाऊ जाधव फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
__________________________________

0/Post a Comment/Comments