होय मित्रा तुला जिंकायचं आहे....

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

         आयुष्यात सर्वांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागत असतो, आणि होय यशस्वी व्हायच असेल तर निश्चित या गोष्टीना सामोरे जावच लागेल...
         परतु आपण स्वतः ला इतरान समोर सिदध करत बसू नका. इतरांपेक्षा वेगळे बना भलेही लोक तुम्हाला वेड म्हणेल, वेड्या लोकांनी केलेली कारनामे प्रत्येक जण कौतुकानो बघत असतात....
       कधिही आपण आपल्या मनासोबत हरायच नसत. आज ना उद्या आपण करत असलेल्या कामाचे फळ निश्चित मिळत असते. जिंकायच तर थांबु नका. थांबल की संपत असत आणि आपल्याला संपायच नाही तर जिंकायच. एक महत्वाची गोटी सुरुवात ही शुन्यातून करायची असते एकदा झालेली सुरुवात परत आपल्याला केव्हाही शुन्य होऊ देत नसते... मग तुम्ही कुठेही जा अवगद झालेल्या गोष्टी तुम्हाला नक्किच नामांकित करेल यात तिळमात्र शंका नाही.    
        मित्रांनो केवळ एकच संधी आपल्या आयुष्यात नसते अशा अनेक संध्या आपण निर्माण करू शकतो फक्त त्यासाठी आपल असण गरजेच असत केव्हाही नैराशात जाऊ नका केव्हाही गरज पडली तर आपल्या मित्रांना सांगा, आपण आहोत तर सर्व जग आहे, अन्यथा कोणालाही आपण नसल्याची उणिव भासणास नाही. दैनिक लोकनेता चे सल्लागार आमचे स्नेही अँड डॉ. कस्तुरे साहेब यांच्या भाषणात नेहमी ऐकत आलेल्या बाना पापळकर यांच्या ओळी 

      सबकुछ तो जल गया,
      अब बचा क्या है ?
     और जब मैं बचा हू,
     तो फिर जला क्या है...

       मित्रांनो आपल आयुष्य इतरांपेक्षा वेगळं असाव आणि ते आपल्याला निर्माण करावच लागतय, ते आपल्या सामर्थावर...
          बस येवढच सांगेल.... नाही नाही म्हणता तुमच्या सर्वाच्या साथीने आज दैनिक लोकनेता चे 60 प्रतिनिधी महाराष्ट्रात काम करतात पणामुळेच आणि हे न सोडलेल्या वेडे पणामुळेच आज पण लोक आम्हाला म्हणतात तुमच्यासारखे खूप पत्रकार आहेत पण मि माझ्या मनाला नेहमी सांगत असतो.... तुझा सारखे कोणीच नाही....

            मित्रांनो स्वप्नाच्या शिखरावर आपल्याल पोहचायच, इतरांना ते केवळ बघायच असत, यश अपयश याची इतिहास सुद्धा नोंद घेत नाही पराक्रमी व्यक्तीला इतिहासात जागा मिळते त्यामुळे आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायच. वेळ नेहमी संकटांशी दोन हात करणाऱ्यांनाच संधी देत असते. मिळालेला संधीचे सोन करण हा सर्व प्रथम आपला गुणधर्म असावा.
       अनेक मित्रांना जगत असताना नैराशात गेलेल बघायला मिळत या मागील कारण हेच कि त्यांनी अनेक गोष्टींचा सामना करून त्यांच्या हाती काही लागलेल नसत परंतु संयमाने आपली स्वप्न पूर्ण होत असतात एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नसतं जग जिंकण्यासाठी निघालेल्या सिकंदराला देखिल सर्वस्व साध्य करता आलं नाही. मग आपण सर्वसामान्य व्यक्तीने सर्व जगाच हसन रुसण का डोक्यावर घ्यायचं....
सिकंदर के सपने भी,
बोहत भारी थे
लेकीन जब गये इस जगत से
तब हात खाली थे...
          मित्रांनो जिंकायच्या अगोदर हारू नका सर्व गोष्टी एक ना एक दिवस आपल्याला मिळेलच केवळ आपले पर्यंत हे योग्य मार्गाने सुरू ठेवा, योग्य मार्गाने आणि शांत डोक्यांनी केलेले काम केव्हाही यशाच्या पायऱ्या चढतात. योग्य विचार करा योग्य त्याच मित्राचा सल्ला घ्या नाही तर उग मित्राचे सतरा कांड आणि असा व्यक्तीचा सल्याने तुम्ही मार्गक्रमन करताय अशाने हाती काही लागणार नाही. कवि अनंत राऊत म्हणतात की,
           वाट चुकणार नाही जिवनभर तुझी,
           एक तू मित्र कर आरशा सारखा
          मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा
        वाटेतला सूख सोबती मित्र कधी आपली वाट चुकूच देणार नाही. असा आयुष्यात एक आरशा सारखा मित्र असावा. हल्ली नात्यांचा मित्रांचा गोतावळा. सर्वांचाच असतो तरी सुद्धा परिक्षेचा निकाल लागल्या नंतर अनेक मुल आपली जिवन यात्रा संपवतोना दिसतात पण का ? कधी विचार केलाय, डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी सांगितलय शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, पण सध्याची पिठी हरणी साठी आपला जिव धोक्यात घालतांना दिसतात. 
       व्यावसायिक शिक्षण घेत असताना त्यातुन आपल्याला नौकरी मिळायलाच हवी असा विचास सर्वत्र केला जातो पण का? शिक्षण हे जगण्यासाठी उपयुक्त ठरत. अनेक यशस्वी व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहीले आहेत आणि आज त्याच्या कडे उच्च शिक्षण घेतलेले माणस कामाला आहेत. याचा देखिल खालच्या स्तरावर विचार व्हायला हवा. खूप शिकलो आणि काय फायदा, ही विचित्र संकल्पना अगोदर मनातून, डोक्यातून काढून टाका आणि स्वत:ला सांगा...... अभी तो जवान हु यार...

      मित्रांनो मनसोक्त जगा यशस्वी सर्व जण होणारच आहोत केवळ नैराशात जाऊ नका हीच तुम्हा सर्वाना माझी विनंती आणि शुभेच्छा.....!!!
➖➖➖➖➖➖➖➖
सर्वांचा मित्र
•ज्ञानेश्वर बुधवत
    मुख्यसंपादक दैनिक लोकनेता
    संस्थापक - विश्व फाउंडेशन म. राज्य
    मातृतीर्थ_सिंदखेड राजा
    9960209149
➖➖➖➖➖➖➖➖
__________________________________

0/Post a Comment/Comments