सिंदखेडराजा (प्रतिनिधी) :- वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन दिनांक २५ ऑगस्ट रोजी गंगा लान्स राष्ट्रसंत भगवानबाबा चौक निर्मल नगर अहमदनगर येथे उत्साहात साजरे होणार आहे. या संमेलनासाठी संमेलन अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. सांगिता घुगे या लाभल्या असुन उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप हे लाभले आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पटू राजकुमार आघाव तर सह स्वागताध्यक्ष रेणुका वराडे असुन अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या संमेलनात दैनिक लोकनेताचे संपादक ज्ञानेश्वर बुधवत यांना राष्ट्रसंत भगवान बाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भूषण २०२४ हा पुरस्कार जाहीर !
गेल्या काही वर्षांपासून दैनिक लोकनेता तसेच विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाज प्रबोधन व समाजसेवा करणारा जनसेवक म्हणून ज्ञानेश्वर बुधवत हे नाव महाराष्ट्राला परिचित झालं आहे. छोट्याशा वयामध्येच यशस्वी तसेच विचारवंत लोकांचा सहवास लाभल्याने पत्रकारितेबरोबर समाजसेवेचे वेड लागले व तेंव्हाच फार कठीण परिस्थितीत दैनिक लोकनेता सारखं छोटंसं विचारपीठ सुरु करून अल्प वेळात महाराष्ट्र भर भरारी लोकनेताने घेतली. पण यामागे ज्ञानेश्वर बुधवत नावाचं शांत व संयमी वादळ होतं. याच धडाडीच्या कामाची दखल घेऊन वंजारी महासंघ महाराष्ट्र यांच्या मार्फत ' राष्ट्रसंत भगवान बाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भूषण २०२४ ' हा पुरस्कार दैनिक लोकनेताचे संपादक ज्ञानेश्वर बुधवत यांना नुकताच जाहीर झाला असून पुरस्काराचे वितरणदिनांक २५ ऑगस्ट रोजी गंगा लान्स, राष्ट्रसंत भगवानबाबा चौक, निर्मल नगर, अहमदनगर येथे होणार आहे. यामुळे ज्ञानेश्वर बुधवत यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
__________________________________
Post a Comment