नांदेड | बाजीराव गायकवाड :- नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील पेठवडज येथील बस दहा दिवसापासून बंद आहे कंधार तालुक्यातील मोठी बाजारपेठ पेठवडज येथे असून वारंवार मुखेड आगार प्रमुख वेळेवर बस सोडत नाहीत पेठवडज,शिरशी बु,शिरशी खु, गोणार, जाकापूर, खंडगाव, येलूर, मादाळी, देवईचीवाडी, वरवट, राहटी, बारूळ, औराळ, मंगलसांगवी, लाठ खुर्द, कलंबर खुर्द, या ग्रामीण भागातून शासकीय कामाला रूग्ण दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी,विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालय मध्ये जाण्यासाठी गैरसोय होत आहे.मुखेड आगार प्रमुख मनात येईल तेव्हा बस बंद करतात लोकप्रतिनिधी गप्प बसतात मग सामान्य माणूस पत्रकार यांच्या मार्फत बातमी लावून प्रशासनाला जाग करतात तेव्हा गाडी चालू होते आणि कोणत्याही कारणाशिवाय बस बंद केली जाते त्यामुळे सामान्य माणसाला याचा परिणाम भोगावे लागतात प्रवाशांचे बेहाल होत आहेत पेठवडज सर्कल भागातील नागरिकांनी पेठवडज नांदेड मुखेड बस सोडण्याची मागणी केली आहे.
__________________________________
Post a Comment