तहसीलदार यांच्या सह दोन नायब तहसिलदार रजेवर, जनतेची कामे खोळंबली
लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा(ज्ञानेश्वर बुधवत) :- मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील तहसील कार्यालयाचे तहसीलदार जैस्वाल त्यांच्या वर १२ एप्रिल रोजी कारवाई झाल्या नंतर आजतागत तहसील कार्यालय वाऱ्यावर असल्याचे समोर येत आहे. जैस्वाल यांच्या कारवाई नंतर १६ एप्रिल रोजी तहसिलदार धानोरकर यांनी अतिरिक्त पदाचा पदभार स्वीकारला मात्र तो केव्हा पर्यंत हे निश्चित नाही. काही दिवस की अनेक महिने अतिरिक्त पदाभारावरच तहसील सुरू राहणार हे काही केल्या समजेना.
तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या विषयी माहिती जाणून घेतली असता असे समजले की तहसीलदार रुजू झाल्यापासून त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. वास्तविक पाहता १०० किमी अंतरावर असलेल्या सिंदखेड राजा तहसीलला अतिरिक्त तहसिलदार देणे कितपत योग्य आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातिल पदभार आणि सिंदखेड राजा तहसिल कार्यालयाचा पदभार त्यांना झेपत नसावा म्हणून त्यांच्या कामाच्या दिवसात रजा जास्त असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
असे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळत असताना धानोरकर यांच्याकडे पदभार का म्हणून देण्यात आला असा प्रश्न यानिमित्ताने नागरिक उपस्थित करत आहे.
वाळू प्रकरणाने संपूर्ण तालुक्याचे लक्ष तहसिल कार्यालयाकडे लागले असतांना तहसिल कार्यालयाला तहसिलदार, नायब तहसीलदार उपस्तित नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर विषयाकडे कोणाचेही लक्ष नाही.
इच्छुक उमेदवार गावोगावी फिरू लागलेत मात्र तहसील कडे सर्वांचे दुर्लक्ष
लोकनेता न्युज नेटवर्क
विधासभा निवडनुक तोंडावर येवून ठेपली असताना महविकास आघाडी आणि महायुती चे अनेक इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठी भेटी गावात जावून घेत आहेत. मात्र त्यांना तालुक्यातील जनता तहसील कार्यालयात अनेक कामासाठी त्रस्त असल्याचं दिसत नाही. तहसील कार्यालयातील तहसीलदार तथा ईतर अधिकारी रजेवर असल्यामुळे जनतेची कामे रखडली आहेत त्या कडे त्यांचे मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. आंदोलने,मोर्चे,उपोषण या साठीच तहसील कार्यालय आहे की काय असे प्रश्न जनसामान्य नागरिकांमधून होत आहे.
__________________________________
Post a Comment