हीच केलेल्या उत्कृष्ट कामाची पोचपावती
बुलढाणा (ज्ञानेश्वर बुधवत) :- लोकसभा निवडणूक 2024 मध्ये प्रचार व प्रसार माध्यम समिती चे नोडल अधिकारी अंकुश म्हस्के व सहाय्यक नोडल अधिकारी प्रकाश शिंदे यांनी केलेल्या कामाची जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी घेतली. वर्तमानपत्रातील बातम्यांचा संग्रह केलेली फाईल बघून मा.जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. किरण पाटील यांनी केलेल्या कामाचे मनापासून कौतुक केले.
मा. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी दाखवलेला विश्वास तसेच वेळोवेळी त्यांनी प्रसारमाध्यम समितीला केलेल्या सूचना आणि त्या सूचनांवर केलेली अंमलबजावणी यातूनच आमच्या पूर्ण टीमला मोकळेपणाने काम करायची ताकद प्रा. खडसे यांनी दिली.
प्रसार माध्यामाचे नोडल अधिकारी श्री. अंकुश म्हस्के यांनी देखील चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले जेणेकरून सर्वांना काम करण्यासाठी एक विश्वासपूर्ण वातावरण मिळाले. अंकुश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टीम ने चांगल्या प्रकारे काम पूर्ण केले.
तसेच तत्कालीन मा. तहसीलदार सिंदखेड राजा धानोरकर सर, मा. तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ m, मा. निवडणूक नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री. मनोज सातव,मा.निवडणूक नायब तहसीलदार देऊळगाव राजा अस्मा मुजावर, उमेश गरकळ, संजय सोनुने यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन वेळोवेळी लाभले.
या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा वाटा हा आपल्या सर्व पत्रकार बांधवांचा आहे, सिंदखेड राजा मतदारसंघातील सर्व पत्रकार बांधवांनी खूप चांगल्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रसार माध्यमाला प्रसिद्धी मिळवून दिली. आपण सर्वानी वेळोवेळी दिलेल्या बातम्या यामुळेच आपला हा बातम्याचा संग्रह होऊ शकला, त्यामुळे या सर्व प्रक्रियेमध्ये सर्व पत्रकार बांधवांचे योगदान खूप मोठे आहे तसेच सर्वांच्या सहकार्याने विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सुद्धा असेच चांगले काम करू असे सहाय्यक नोडल अधिकारी प्रकाश शिंदे, दैनिक लोकनेता प्रतिनिधी सोबत बोलताना म्हणाले.
__________________________________
Post a Comment