शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी लढत राहणार - राजेभाऊ फड

राजेभाऊ फड यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मतदारसंघातून नागरिकांची मोठी उपस्थिती

लोकनेता न्यूज नेटवर्क 

बीड (विजय रोडे) :-परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील युवक नेते राजेभाऊ श्रीराम फड यांनी सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघातील माता - भगीनिंची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अर्ज दाखल करतेवेळी मतदारसंघातील जनतेची मोठ्या प्रमाणावर स्वयंस्फूर्तीने उपस्थिती होती. जनतेच्या आग्रहास्तव आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असून शेवटच्या श्वासापर्यंत मी जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेणार असल्याची प्रतिक्रिया युवक नेते राजेभाऊ फड यांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेभाऊ फड यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. तद्नंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवाच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले.

     परळी विधानसभा मतदारसंघात युवक नेते राजेभाऊ फड यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघातील जनता आपल्याला अनुकूल असून यंदाची विधानसभा निवडणूक आपण लढवावी असा जनतेचा आग्रह आहे. देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचा मी कालही आदर करत होतो आणि आजही आदर करतो. पक्षाने कोणालाही जरी उमेदवारी जाहीर केलेली असली तरी शेवटपर्यंत काहीही होऊ शकते. आम्ही आजही आशावादी आहोत, पवार साहेब नक्कीच आमचा विचार करतील. परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या भकाचा विकास करण्याऐवजी मतदारसंघाची वाट लावली. आजच्या घडीला मतदारसंघात त्यांनी हप्तरखोरीला बळ दिलेले आहे, भ्रष्टाचाराला त्यांनी पाठबळ दिले. इथला उद्योग आणि व्यापार बंद पाडण्याचे महापाप त्यांनी केले. त्यामुळे हजारो तरुण आज बेरोजगार झालेले आहेत. मतदारसंघातील गुंडाराज संस्कृतीला पालकमंत्र्यांनी खतपाणी घातल्याने महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे बेहाल झालेले आपल्याला दिसेल. हे सर्व चित्र आता बदलायचे असेल तर आता बदल घडवावा लागेल. मतदारसंघात ऊस उत्पादक शेतकरी संख्या जास्त आहे. असे असतांनाही पालकमंत्र्यांनी वैद्यनाथ कारखाना बंद पाडण्याचे महापाप केले. इथली कारखानदारी संपुष्टात आणली... तुम्ही मला आमदार करा मी तुम्हाला कारखाना देतो. जो कारखाना कधीही बंद होणार नाही असे आश्वासन हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला राजेभाऊ फड यांनी दिले.

गुंडाराज संस्कृती संपुष्टात आणायची


    राज्यातील इतर मतदारसंघात आणि परळी मतदारसंघातील वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल आहे. परळीतील नागरिक दहशतीखाली जीवन जगत आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी आपापली संपत्ती विक्री काढली असून ते स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. असेच होत राहिले तर इथली सामाजिक आणि आर्थिक घडी विस्कटली जाईल. म्हणूनच मी संघर्ष करत असून मला फक्त परळीतील गुंडाराज संस्कृती संपुष्टात आणायची असे प्रतिपादन युवक नेते राजेभाऊ फड यांनी केले.
__________________________________

0/Post a Comment/Comments