सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात महाराष्ट्रभर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.त्यात महाराष्ट्रातील काही जागांवर सर्वच राजकीय पक्षांमधील तिकीट वाटपावरून रस्सी खेच बघायला मिळाली. सिंदखेड राजा विधानसभा निवडणुकी मध्ये डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादा पवार यांच्या गटातून थेट शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे मतदार संघातील सर्वच राजकीय पक्षांचे समीकरणेच बदलली होती. डॉ.शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला, तिकीट ही मिळवले आणि उमेदवारी अर्ज हि दाखल करून टाकला. परंतू अजितदादा पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या मधील जागा वाटप निश्चित होत नव्हते.परंतु अनेक जण शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे तिकिटासाठी आग्रही होते. कालपर्यंत डॉ.शशिकांत खेडेकर हे घड्याळ हाती बांधणार असे चित्र होते. परंतु आज एकनाथ शिंदे शिवसेनेच्या तिसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात सिंदखेड राजा विधानसभा साठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता सिंदखेड राजा विधानसभेची निवडणूक ही तुल्यबळ होण्याची शक्यता आहे. डॉ शिंगणे यांच्या समोर डॉ.खेडेकर हे मोठे आव्हान असतील.
__________________________________
Post a Comment