मित्रहो....
थांबा अन थोडे लक्ष द्या, तुमच्या साठीच लिहलय हे....
आजच्या नंतर एक महिन्याने मतदान. पण जे दान आपण देतो ते केवळ नेत्यांच्या भल्यासाठी की जनतेच्या हितासाठी....?
आता निवडणूक आली आहे त्यामुळे नेते तुमच्या कडे भिकाऱ्याचे रूप धारण करून येणारं यात शंका नाही. पण आजी माजी नेत्यांनी आजवर काय काय केले ? आणि भावी नेते खऱ्या जनहितार्थ पुढे काय करणार ? यांचे उत्तर ते देऊ शकतात का ?
याचा थोडा धुंडाळा घेणे हे, लोकशाहीचे कर्णधार या नात्याने तुमचे आद्य कर्तव्य आहे. यावर आधी थोडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
थोडे उदाहरणासह बोलू....
आपला बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ अर्थात राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेराचा तसेच छत्रपतींच्या आजोळाचा जिल्हा....
त्यामुळेच सिंदखेड राजा नगरीचे
ऐतिहासिक महत्त्व वेगळेच.
एवढेच नाही तर तिच्या शीवेवरंच नव्हे, हाकेच्या अंतरावर जागतिक कीर्तीचे, चंद्रावरील दगड मातीशी सख्खे नाते सांगणारे पृथ्वीवरील पापडखाराचे एकमेव लोणार
सरोवर....!
आणि शेजारीच भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीच्या सुवर्णकालीन वैभवाची साक्ष देणारी अजिंठा लेणी सुध्दा !
थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास अवघ्या विश्वातून कोट्यवधी पर्यटकांना जीवनात एकदा तरी भेट द्यावीशी वाटण्याची ही एकमेवाद्वितीय केंद्रे. आणि तसे झाल्यास अनगिणत निधीचा देशी व परदेशी चलनाच्या रूपात धबधब्याच्या पाण्यासारखा
ओघ लागण्याची ठिकाणे मातृभूमीच्या अंगावरील अलंकारासमान चमकणाऱ्या ठिकाणांचा जिल्हा.....!
पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, इथे विकासाची गंगा अनेक वर्षा पासून वाहतेय, इथे गावेची गावे विकसित झालीत, रस्ते म्हणाल तर अमेरिकेच्या रस्त्यांसारखी... रोजगार म्हणावा तर इथे पुण्या मुंबईवरून लोक कामाला येतात. इथे आज पर्यंत कधी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही. कोणीच पुलावरून वाहून गेले नाही, म्हणजे येथील पुल ब्रीज सारखे उंच आहेत. इथे पर्यटन स्थळे विकसित झालीत, त्यातून अनेक गरजूंना रोजगार उपलब्ध झालाय....
आणि महत्वाचे म्हणजेआमच्या दोन तालुक्यातील मतदार संघामध्ये कधीच नेत्यांनी जातीवाद केला नहीं, येथील कोणत्याच नेत्याकडे लाखो कोटीच्या गाड्या अजिबात नाहीत. केवळ जीवन जगता येईल इतकाच मर्यादित पैसा त्यांच्या कडे आहे....
नेते नेहमी गरजूंना मदत करतात गावोगावी जातात. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतात. असे निष्ठावंत राजकारणी आमच्या मतदार संघाला लाभलेत....
असे म्हणता येण्यासारख येथे कधी घडले आहे का....?
अस यातलं काहीच आमच्या मतदार संघात घडलेलं नाही हीच शोकांतिका...
असो ! या बद्दलही आपल्याला काही बोलायचं नाही.. कारण गाढवाला सिंह देखील आपणच केलं हेही तितकेच खरे...
पण आमची भावंडं इथे काम नाही म्हणून आपल्या पोटाची खळगी भरायला पुण्या मुंबईत रोज आपल्या आयुष्याची माती करतात त्याचे काय? आई वडिलांना सोडून नाईलाजाने ते तिकडे राहतात. मग मतदार संघ विकसित कुठे झालाय ते दाखवा? अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा....
पण त्या पूर्ण होण्यासाठी इथे मूलभूत बाबी आहेत का?
जर गावाकडे रोजगार असेल, शेतीला पुरेसं पाणी मिळालं तर कोणालाही भटकण्याची वेळ येणार नाही असे मला वाटते. अहो गावाकडे एखादा नागरिक मेला तर त्याला मुले पुण्या-मुंबई वरून येई पर्यंत झाकून ठेवावे लागते, ही परिस्थिती इथे आहे.
मित्रहो नेता कधीच निस्वार्थी नसतो. इथे कार्यकर्ते आपल्या जागेवर आहेत. पण नेत्यांनी निष्ठा विकलेली दिसते. नेते गेले पण कार्यकर्ते आहेत. याला काय म्हणावं...
पॉइंट टू पॉइंट बोलायचं झालं तर आमचा विकास चोरीला गेलाय आणि प्रगती तर कित्येक वर्षांची कुण्याभलत्याचा हात धरून पळून गेलीय. अस म्हणायला वागवं ठरणार नाही.
आमच्या शहरांसाठी लाखो नव्हे तर कोटीच्या कोटी निधी आलाय मागील काही वर्षात पण गेला कुठे हे आम्हला देखील कळाले नाही. मग बाहेरच्यांनी न बोललेले बरे. कारण आम्ही इथे राहणारे सर्व लोक मूर्ख आहोत.
याचा आम्ही कधी विचार करणार आहोत का....?
हा माझा तुम्हाला सवाल आहे....!
त्यासाठी हा प्रपंच....!
वाचाल तर वाचाल....!!
➖➖➖➖➖➖➖➖
सर्वांचा मित्र
मुख्यसंपादक, दैनिक लोकनेता
संस्थापक - विश्व फाउंडेशन म. राज्य
मातृतीर्थ_सिंदखेड राजा
9960209149
➖➖➖➖➖➖➖➖
__________________________________
Post a Comment