कुल-थोरात यांना सक्षम पर्याय विरधवल जगदाळे !

जगदाळे यांना मोठा राजकीय वारसा!दौंडच्या जनतेच्या अपेक्षा वाढल्या.. 

लोकनेता न्युज नेटवर्क

दौंड | बबनराव धायतोंडे :- गेल्या विस वर्षापासून दौंड तालुक्याचे राजकारण कुल आणि थोरात यांच्या भोवती फिरताना दिसत आहे,परंतु २०२४ ला हे चित्र बदलू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे.
    विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर दौंड तालुक्यातील कुल आणि थोरात अशीच लढत रंगणार याची शक्यता वर्तवली जात असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून अधिकृतपणे विरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांनाच धक्का दिला आहे.
     तालुक्यात कुल आणि थोरात हेच राजकारणात अंतिम आहेत असं समजणाऱ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज मोठा धक्का मानला जात आहे. जगदाळे कुटुंबाला राजकीय वारसा असून विरधवल जगदाळे यांचे आई आणि वडील दोघांनीही दौंड विधानसभेत तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे विरधवल जगदाळे यांच्या रूपाने दौंड शहराला आपल्या भागातील हक्कचा लोकप्रतिनिधी विधानसभेत मिळू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.
   गेल्या विस वर्षात राजकारणात काहीही झालं तरी कुल आणि थोरात या मातब्बर घरांकडेच पाहिले जात होतं दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात असणारी राजकीय सत्ता यावेळी दौंडच्या पूर्व भागात येण्याची शक्यता आहे. मतदानाच्या तुलनेने तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात मतदार असून त्यांनी प्रादेशिक बाजूचा विचार करता विरधवल जगदाळे यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतल्यास विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे उमेदवार रमेश थोरात आणि महायुती भाजपाचे उमेदवार राहुल कुल यांच्या अडचणी वाढू शकतात.त्यामुळे माघारीच्या दिवशी दौंड तालुक्यातील विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल.परंतु तत्पूर्वीच तालुक्यातील पूर्व भागाला विरधवल जगदाळे यांच्या रूपाने बलाढ्य सक्षम लोकप्रतिनिधी मिळू शकतो अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे.
_____________________________

0/Post a Comment/Comments