सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- राज्य शासनाने रब्बी हंगाम पिक नोंदणी शेतकऱ्यांसाठी ई पिक पाहणी अर्थात अँपद्वारे पिकाची नोंदणी करण्यासाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकाची ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.
दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून ते 15 जानेवारी 2024 पर्यंत रब्बी हंगाम करिता शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची इ पिक पाहणी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जे पीक पेरले आहे त्या पिकाची नोंदणी ई पीक पाहणी ॲपद्वारे करावे. ई पीक पाहणी न केल्यास यानंतर आपणास नैसर्गीक आपत्ती अनुदान, पीक विमा तसेच त्यासंबंधी शासनाचे लाभ ई पीक पाहणीच्या आधारे मिळणार आहेत याची नोंद घ्यावे. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली मदत ही "ई पीक पाहणी" च्या आधारे दिल्या जात आहे. यापुढील अनुदान सुद्धा हे "ई पीक पाहणी"च्या आधारा वर दिल्या जाणार आहे. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. सिंदखेड राजा उपविभागामधील सर्व शेतकऱ्यांनी बंधूंनी ई पिक पाहणी विहित वेळेत नोंदवून घ्यावी असे कळकळीचे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.
____________________________
Post a Comment