ह.भ.प. कांचनताई शेळके यांचे किर्तन व गुणवंतांचा गौरव
नांदेड|बाजीराव गायकवाड :- मौजे कलंबर (भोपाळवाडी) ता.लोहा येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी समाज उन्नती शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव कै.निवृत्तीराव पाटील घोरबांड यांच्या जयंतीनिमित्त दि.४ जानेवारी २०२५ रोजी शनिवारी सकाळी ११ वा. ह.भ.प.कु.कांचनताई शिवानंद शेळके मु.अमडापुर ता.उमरखेड जि.यवतमाळ यांच्या हरी किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विश्वाभरराव गंगाधरराव पवार (उपाध्यक्ष -समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर), हे रहाणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मुद्रीकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड (सचिव-समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर), डॉ.सौ.सुरेखा विश्वंभरराव पवार ( सदस्या- समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर) यांच्या उपस्थितीत जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी परीसरातील गावातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी , पालक जेष्ठ नागरिक वैष्णव संप्रदाय भक्त मंडळी, भाविक भक्त मंडळी,माता भगिनी यांनी हरी किर्तन सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्यात सहभागी व्हावे आणि सर्वांनी या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहावे असे आवाहन श्री.मारोतीराव निवृत्तीराव पाटील घोरबांड साहेब (अध्यक्ष -समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर) यांनी केले आहे.हरी किर्तन सोहळा व गौरव गुणवंतांचा सत्कार संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्वानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे.जयंती सोहळ्याचे ठिकाण संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर येथे आहे.
_______________________________
Post a Comment