सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- दि. 22 जाने रोजी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे नियोजित, बहुजन साहित्य संघ चिखली च्या साहित्य संमेलन 2025 संदर्भात चौथी बैठक सिंदखेड राजा येथे पार पडली. आयोजित बैठकीमध्ये बहुजन साहित्य संमेलनाची तारीख ब.स. संघाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी घोषित केली आहे. दिनांक 31 मार्च 2025 रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत बहुजन साहित्य संमेलन पार पडणार असून. या संमेलनासाठी महाराष्ट्रभरातून साहित्यिक येणार असून. साहित्यिकांची मांदियाळी जिजाऊंच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत भरणार असून यासंमेलानासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बहुजन साहित्य संमेलनाची चौथी बैठक ही डॉ. डी. व्ही. खरात यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली असून या बैठकीसाठी ब. स. संघाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. तर या बैठकीसाठी दैनिक लोकनेता चे संपादक ज्ञानेश्वर बुधवत, संपादक राहुल झोटे, ज्येष्ठ कलाकार बबनराव महामूने, अंकुशराव पडघान हे उपस्थित होते.
_________________________
Post a Comment