अन्यथा तहसील कार्यालयासमोर रामदास कहाळे करणार आमरण उपोषण
सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- प्रधानमंत्री घरकुल योजना तालुक्यात जोरात सुरू असून काही घरकुल धारकांना घरे बांधण्यासाठी जागाच नसल्याने ते घरकुलाच्या लाभा पासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे हेक्टर ने जमिनी संस्थानी बळकावून त्या मध्ये तालुक्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांनी अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करून उभे केले आहे. खाजगी आनुदानित शाळानी अतिक्रमण करून इमारती उभ्या केल्या आहेत.
एकीकडे घरकुल योजनेच्या माध्यमातून अतिक्रमण करणाऱ्या लाभार्थ्यांना महसूल विभाग 20 बाय 30 जागा देत नाही. त्यामुळे त्यांना घरकुल योजने पासून वंचित राहावे लागत आहेत.आणि दुसरीकडे महसूल विभागाच्या शासकीय जमिनीवर खाजगी शैक्षणिक संस्थांनी कुठे 1 एकर तर कुठे 2 ते 3 एकर जागा ताब्यात घेतल्या आहेत. त्या जमिनीवर अतिक्रमण करून इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे धनदांडग्या संस्थांनीकांना महसूल प्रशासन पाठीशी घालत असून सदर अतिक्रमण करणाऱ्या शाळेचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असे रामदास कहाळे तालुका अध्यक्ष आजाद समाज पार्टी सिंदखेड राजा यांनी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तहसिलदारांपुढे नवे आवाहन, काय कारवाई करतील या कडे सर्वांचे लक्ष
धनदांडग्या संस्थांनिकांना महसूल प्रशासन पाठीशी घालत असल्याचा रोख आरोप आजाद समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष कहाळे यांनी केला आहे. तालुका भर प्रत्येक गावात महसूल ची जमीन असून त्या संस्थानिकांनी बळकावळ्या आहेत हे स्पष्ट असून आता त्यासाठी पहिल्यांदा कोणी तरी आवाज उठवला आहे. तर याकडे मा. तहसीलदार लक्ष घालून काय कारवाई करतील हे बघण्यासाठी तालुक्यातील जनता उत्सुक आहे. महसूल विभागाने केवळ वाळू उत्खन्न करणाऱ्या वाळूमाफियांमध्येच दंग न राहता, याकडे ही लक्ष द्यावे अशी तालुक्यातील जनता अपेक्षा करत आहेत. सिंदखेड राजा तहसिलदारांपुढे आता हे नवे अहावन असून ते या वर काय कारवाई करतील या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_________________________
Post a Comment