राष्ट्रीय मिलिटरी स्कुल प्रवेश परीक्षेत संबोधी मवाडे भारतात दुसरी

लोकनेता न्यूज नेटवर्क

गेवराई :- राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून ८ जाने २०२५ रोजी भारतातील नामांकित लष्करी शिक्षणासाठी अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पाच राष्ट्रीय मिलिटरी स्कुलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव ता . गेवराई येथील इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी

   कु.संबोधी सिमा महेंद्र मवाडे*l हिने मुलींमधून देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान व इंग्रजी विषयावर आधारित लेखी प्रवेश परीक्षेत तिने १५० पैकी १३२ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले . पुढील मुलाखती साठी तिची निवड झाली आहे. मुलाखतीनंतर तिला मिलिटरी स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये प्रवेश मिळणार आहे. लष्करी शाळांसाठी दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला सुमारे ७० हजार ते ८० हजार विद्यार्थी उपस्थित असतात . त्यातून ३५० विद्यार्थी निवडले जातात. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयामार्फत चालवले जाणारे भारतातील शाळांचे नेटवर्क आहे. देशाच्या विविध भागांतील तरुण मुला-मुलींना लष्करी प्रशिक्षणासह दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने या शाळांची स्थापना करण्यात आली आहे. या यशासाठी सेल्फ स्टडीसोबत सातारा येथील आय कॅन इन्स्टिट्यूटचे फौंडेशन क्लास केले आहेत ,असे तिने सांगितले . यासोबत तिने आपल्या यशाचे श्रेय प्राथमिक शिक्षक असणाऱ्या आपल्या आई-वडिलांना व शाळेतील शिक्षक तसेच आय कॅन इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षकांना दिले आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. गेवराई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे, आय कॅन इन्स्टिट्यूटचे संस्थापक 

नवनाथ देशमुख , आयकर अधिकारी गोपाळ गायकवाड, गोळेगावचे सरपंच सिद्धेश्वर काळे, शा.व्य.समिती अध्यक्ष केशव काळे, केंद्रप्रमुख कैलास चव्हाण , जातेगाव केंद्राचे मुख्याध्यापक काळूसिंग सोनवणे ,गोळेगाव शाळेचे मुख्याध्यापक संतोष तुरे , सेलू शाळेचे मु.अ.हिरालाल जाधव आदींनी कु.संबोधीला मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केंद्रातील शिक्षक आर्दड ,घोडके , सतीश पल्लेवाड ,चव्हाण ,जमदाडे , ओव्हाळ ,पवार मॅडम,ढोकणे ,कारंडे ,भंडारे , वाडेकर ,कुरे यांनी तिचे या यशाबद्दल विशेष अभिनंदन केले.तसेच या यशाबद्दल तिच्यावर जिल्ह्याभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

_________________________

0/Post a Comment/Comments