सिंदखेड राजा/ज्ञानेश्वर बुधवत :- मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ गाथा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, दि. 10 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ वंदना महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सहभागी 100 कलाकारांचा समूह मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे दाखल झाला होता. या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाला वंदन करणाऱ्या गीतापासून होऊन अनेक सांस्कृतिक गीतांवर नृत्य करत मातृतिर्थ नगरीतल्या प्रेक्षकांना कलाकारांनी बेधुंद करून टाकले.
या कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊं व छत्रपती शिवाजी महाराज साक्षात मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत अवतरल्याचे दिसले. आणि उपस्थित नागरिकांनी राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांना बघण्यासाठी तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी अनपेक्षित गर्दी यावेळी जमली होती. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थान असलेले राजे लखोजिराव जाधव यांच्या राजवाडा परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व नगरपालिका प्रशासन यांच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे अतिरिक्त जिल्हाधिकारी मा. शेलार, मा. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे सिंदखेड राजा, मुख्याधिकारी प्रशांत होटकर हे उपस्थित होते.
_________________________
Post a Comment