गुरुकुल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
गेवराई | ज्ञानेश्वर उदावंत :- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा गुरुकुल येथे आज प्रामाणिक प्रयत्न केला असून चिमुकल्यांच्या सुप्त कलागुणांचा अविष्कार म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय तर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चितच मिळते असे प्रतिपादन पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी केले.
गेवराई येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मन्यारवाडी रोड येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे रविवार दि.२० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवानी बॅंकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, प्रमुख पाहुणे म्हणून पांचाळेश्वरचे महंत बप्पाआण्णा महाराज , माजी सरपंच संतराम काळे , संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव कुटे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.मोहन ठाकर, पत्रकार प्रदिप जोशी, संपादक अमोल वैद्य, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विनोद पौळ, पत्रकार विनायक उबाळे, पत्रकार प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अरुणा ठाकर सह आदी मान्यवर व पालक उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, मॉंसाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर संस्थेच्या वतीने समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला तर यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी शिवराज्यभिषेक सोहळ्याचे सादरीकरण करुन विविध हिंदी, मराठी तसेच देशभक्तीपर गितांवर नृत्य करुन उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाला पुरुषांसह महिला पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा.महोन ठाकर, सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक आदिनाथ बोराडे , जेष्ठ शिक्षक राजु घुले यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा मिस, पवार सुनंदा, खरात संध्या, चोरमले वैष्णवी, अश्विनी झेंडेकर , मोरे सीमा, दूधसागर प्रतीक्षा, चौधरी आकांक्षा, बेद्रे कोमल, बागवान मशिरा यांनी परिश्रम घेतले. तर वादे यांनी आभार व्यक्त केले.
समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा झाला गुणगौरव
गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी सामाजिक दायित्व म्हणून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट शेतकरी बाळासाहेब शिंदे, हरिभाऊ कदम, ॲड.शरद कुलकर्णी, ॲड.मोसिन इनामदार, बाबासाहेब डिंगरे, लक्ष्मणराव दाभाडे यांचा सन्मान करण्यात आला.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये कु.वैष्णवी हरिभाऊ करांडे, कु.समीक्षा राम म्हेत्रे, लक्ष्मण महादेव जरक यांचा समावेश आहे.
_______________________
Post a Comment