- सिंदखेड राजा तालुक्यात जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ
- वाघजाई येथील सरपंचांना धमकी देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई साठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी बसले जलजीवनच्या कार्यालयात ठाण मांडून
- अधिकारी, ठेकेदारांनी लावला साडेचार कोटीला चुना
लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा|ज्ञानेश्वर बुधवत :- माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून पाणीटंचाई असलेल्या गावांची तहान भागवण्यासाठी 81 कोटी 65 लाख जल जीवन चे कामे देण्यात आली. मात्र आता मागील पंधरा दिवसांपासून वारंवार या जलजीवन मिशनचे नवनवीन कारनामे समोर येताना दिसते. अद्याप एकही जल जीवन मिशनचे काम पूर्ण झाले नसून तालुका हा तहानलेलाच आहे 81 कोटी खर्च करून सुद्धा जर तालुका तहानलेला असेल तर याकडे लक्ष कोण घालणार?
मागील काही दिवसांपासून अनेक वृत्तपत्रांनी हा विषय ताणून धरला आहे. मात्र जल जीवन मिशनचे कर्मचारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी याकडे डोळे उघडून बघण्यास तयार नसल्याचे चित्र मात्र सिंदखेड राजा येथे तयार झालेले आहे. जलजीवांच्या ठेकेदारांची दादागिरी, अधिकाऱ्यांच्या गोलमेल, या प्रकाराने आता नागरिक जास्त त्रस्त झाले आहेत, मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही या प्रश्नावर बोलण्यास कोणीही तयार नाही अद्याप कामे पूर्ण नसून अधिकारी संबंधितांना तक्रारदारांना वेळ मागत आहे.
सद्यस्थितीमध्ये याकडे कोणीही लक्ष घालायला तयार नसून जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव हे या विषयाकडे लक्ष घालतील का? ही माफक अपेक्षा आता सिंदखेडराजा तालुक्यातील त्रस्त नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
76 गावांसाठी ८१ कोटींची कामे मंजूर होऊन अद्यापही काम पूर्ण नसून कामे मंजूर झाल्यापासून मागील पाच वर्षांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न हा तालुक्यात जोर धरत असताना, मागील पाच वर्षात चक्क चार कोटी 42 लाख 46 हजार 940 रुपये पाणी टंचाईवर शासनाला खर्च करावी लागलेत, यामध्ये जलजीवनची गावेच मोठ्या प्रमाणात सामील असून विहीर अधिग्रहण,व टँकर साठी वरील निधी खर्च करण्यात आला आहे आणि यापुढे जोपर्यंत कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत शासनाला पाणीटंचाईवर किती खर्च करावा लागेल हा प्रश्न सर्वांच्या मनात धरून आहे. कामे पूर्ण होणारच नसेल पाणी टंचाईचा वेगळा निधी गावावर खर्च करायचा असेल तर जल जीवन मिशन ही योजना कशासाठी? असा सवाल तालुक्यातील जनता करीत आहे.
नुकतेच तालुक्यातील वाघजई येथील सरपंचांनी उपविभागीय अभियंता यांच्याकडे ठेकेदाराने वाघजई गावाची फसवणूक केल्याप्रकरणी फोजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती त्यानुसार संबंधित ठेकेदाराने वाघजई येथील सरपंच गजानन सानप यांना 17 जानेवारी रोजी धमकी दिली की तुझ्या गावाला एकही थेंब पाणी पुरवठा करणार नसुन तुझ्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याची धमकी दिली आहे यासंबंधी सिंदखेडराजा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
मस्साजोग च्या धरतीवर सिंदखेड राजा तालुक्यातील वाघजई येथील सरपंच असुरक्षित
सिंदखेड राजा तालुक्यातील वाघजई येथील सरपंचांनी मागील चार वर्षापासून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा अभियंत्याकडे संबंधित योजनेच्या तक्रारी केल्या असल्याने 17 जानेवारी रोजी सरपंच सानप यांना ठेकेदारांनी धमकी देऊन तुला गाडीने उडवेल. आहे तो पर्यंत तुझ्या गावाला पाणी मिळू देणार नाही, अशी भीतीदायक धमकी दिली असून सरपंचांनी पोलीस स्टेशन सिंदखेड राजा येथे धाव घेतली असता सिंदखेड राजा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे. पोलीस स्टेशन सिंदखेड राजा यांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. मात्र मागील एक महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा धक्कादायक प्रकार लक्षात घेता संबंधित पोलीस स्टेशन ने तातडीने ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. संबंधित ठेकेदाराचे नातलग पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली असून, आता पोलीस खाते देखील कोणाच्या दवाबा खाली न येता काय कारवाई करेल याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधल्या गेले आहे.
जलजीवांच्या भ्रष्ट कामाकडे वरिष्ठ अधिकारी डोळे झाक करत असतील तर तालुक्याचे चित्र हे बीड सारखे होण्यास वेळ लागणार नाही.
उपविभागीय अभियंत्याची आता पत्रकारांनाही विशेष सूचना
जल जीवन संदर्भात तालुक्यातील पत्रकारांनी उपविभागीय अभियंता मालोकार यांच्याशी चर्चा करून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बातमी प्रकाशित केल्यानंतर मालोकार यांनी बातमी लावणाऱ्या पत्रकारांना विशेष सूचना दिली असून, आपण जे कार्यालयात बोलतोय ते पेपर मध्ये जशास तसे छापू नका, असे म्हटले आहेत. चर्चा होऊनहीं जर पत्रकारांनी बातमीमध्ये जलजीवांची मुद्दे मांडायची नसेल तर; जल जीवन मध्ये झालेल्या निकृष्ट कामाबद्दल कोण बोलणार की न बोलता अधिकारी कर्मचारी ठेकेदार संयुक्त विद्यमानाने जलजीवांची योजना अशीच राबवून तालुक्यातील नागरिकांना तहानलेले ठेवणार का? हा प्रश्न नागरिकांच्या समोर उपस्थित झाला आहे.
_________________________
Post a Comment