बुलढाणा|ज्ञानेश्वर बुधवत :- जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना.मकरंद पाटील हे जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी शनिवारी जिल्ह्यातील विकासकामे, योजना, प्रकल्पांसह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला.
जल जीवन मिशनच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाच्या बातम्या अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील झाल्या आहेत. तर काही वृत्तपत्रानद्यारे तालुक्यातील बट्याबोल झालेल्या जल जीवन मिशनकडे जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष घालतील का असा आशावाद व्यक्त करण्यात आला होता, त्याच अनुसंघाने आता जिल्हा आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी चर्चा केली असून यावर पालकमंत्री काय निर्णय घेणार आहेत या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीला आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांचेसह उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित आहेत.
पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी या बैठकीत जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थितीसह कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, सिंचन प्रकल्प, पर्यटन, रस्ते व रेल्वे प्रकल्प, वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालय, सिंदखेड राजा व लोणार विकास आराखडा, वने, नगरविकास, एसटी बस व डेपो, ई-नाम सुविधा, शेततळे, घरकूल, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कौशल्य विकास व रोजगार, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प, प्रधानमंत्री सुर्यघर योजना, आवास योजना, जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, जलजीवन मिशन, मनरेगा यासह विविध विषयांचा आढावा घेतला.
या बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांनी सर्व प्रशासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा परिचय करुन घेतला.
जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामे, प्रकल्प, योजना, उपक्रमांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
_________________________
Post a Comment