अर्जुनी मोरगाव :- दि.१९-०१-२०२५ रोजी झाडीपट्टितील घनदाट अरण्याने नटलेल्या प्रदेशातील अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया येथे सुप्रसिद्ध कवयित्री छाया बोरकर यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषद साहित्य संमेलनात, महाराष्ट्रंच नव्हे तर साहित्यधारा छ.संभाजीनगर तर्फे आयोजित नेपाळ येथील अंतर्राष्ट्रीय स्तरावरील काव्य महोत्सवातून गाजलेल्या तथा आपल्या परकायाप्रवेशी प्रादेशिक बोलीभाषा प्रधान कथाकथनासाठी साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त कथाकार कवी डॉ.बबनराव महामुने, छ.संभाजीनगर यांचा, त्यांच्या काव्य तथा कथा कथनास्तव, आपल्या अनेक मराठी नाटके तथा चित्रपटांच्या लेखन, दिग्दर्शन तथा अभिनयामुळे झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री प्राप्त डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील ख्यातनाम व दिग्गज साहित्यिक तथा लेखक व समीक्षक प्रा. डॉ. अनंता सूर, प्रा. डॉ.ईश्वर मोहुर्ले तसेच प्रा. डॉ.शाम मोहरकर इत्यादींसारख्या मान्यवरांच्या तथा आपल्या सामाजिक क्षेत्रातील समर्पित व सेवाभावी कार्यास्तव अमेरिकेतील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केलेल्या व अप्रतिम काव्यगायनामुळे अंतर्राष्ट्रीय स्तरावर नेपाळ काव्य महोत्सवाचे अध्यक्ष पद भूषविलेल्या व विविध पुरस्कारांनी पुरस्कृत हरहुन्नरी डॉ.विजयकुमार कस्तुरे तथा डॉ. डी.व्ही.खरात, चिखली जि.बुलढाणा यांच्यासह महाराष्ट्रातील बहुतांश मान्यवर कवि, कवयित्री, साहित्यिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या संमेलनात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यावेळी डॉ. डी.व्ही.खरात सर यांनाही अ.भा. इंडीयन आयडॉल ॲवार्ड प्रदान करून संमेलनाध्यक्ष डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
_________________________
Post a Comment