बुलढाणा :- भारतीय डाक विभागामार्फत दि. 24 जानेवारी 2025 रोजी “राष्ट्रीय बालिका दिवस” दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, डोंगराळ, वंचित व बँकिंग सेवा नसलेल्या भागातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुकन्या समृद्धी योजना विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत सर्व नागरिकांनी जवळच्या डाक कार्यालयात संपर्क साधून आपल्या 10 वर्षांच्या आतील मुलींचे सुकन्या समृध्दी खाते काढून मुलींचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.
_________________________
Post a Comment