केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट मेडिकल असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

लोकनेता न्यूज नेटवर्क

कंधार | धोंडीबा मुंडे :- केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट मेडिकल असोसिएशन कंधारच्या वतीने केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ (अप्पासाहेब) शिंदे ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या वर्षानिमित्त दि.२४ जानेवारी रोज शुक्रवार सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत साधु महाराज मठ संस्थान गांधी चौक कंधार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,

      तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसियनचे मराठवाडा अध्यक्ष दीपक कोठारे,मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष शंतूने कोटगिरे,कंधार मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक चालीकवार तसेच तालुक्यांतील सर्व केमिस्ट बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

     केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ (अप्पासाहेब) शिंदे ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या वर्षानिमित्त सकाळी ठिक ८ ते सायं ६ पर्यत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन तालुक्यांतील सर्व इच्छूक नागरिकांनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन कंधार मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक चालीकवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

_________________________

Post a Comment