राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी होणार नतमस्तक
बुलढाणा | ज्ञानेश्वर बुधवत :- राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हे शनिवार, रविवार दि. 25 व 26 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार शनिवार दि. 25 जाने रोजी ते छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 11.45 वाजता सिंदखेड राज येथे आगमन व जिजाऊ मॉ साहेब जन्मस्थळी अभिवादन करून राष्ट्रमाता जिजाऊ चरणी नतमस्तक होणार होऊन जिजाऊ सृष्टीस भेट देणार आहे. दुपारी 12.15 वाजता ॲड. नाझेर काझी(जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांच्या निवासस्थानी भेट आणि राखीव. दुपारी 12.45 वाजता देऊळगाव राजाकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता देऊळगाव राजा येथे आगमन व आमदार मनोज कायंदे यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 1.45 वाजता बुलढाणाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव.
रविवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.10 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथून पोलिस कवायत मैदानाकडे प्रयाण व सकाळी 9.15 वाजता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बुलढाणा पक्ष कार्यालय येथील बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता बुलढाणा येथून शेगांवकडे(संत नगरी) प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शेगांव येथे आगमन व श्री संत गजानन महाराज दर्शन. दुपारी 3 वाजता मुंबईकडे प्रयाण असा त्यांचा 2 दिवशीय नियोजित दौरा असणार आहे.
जिल्ह्याचे पालक मंत्री आढावा बैठकित जल जीवन मिशनच्या मुद्द्यावर चर्चा करतील का?
मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यासाठी अंदाजे 81 कोटी रुपयांची जल जीवन योजनेची कामे सुरू असून अद्याप एकही काम पूर्ण नसून. तालुक्यातील अनेक गावे तहानलेली आहे. परंतु या कडे कोणाचे लक्ष नाही. संबंधित कामाचे गुत्तेदार योजना कधी पूर्ण करतील या बद्दल कोणीही विचारणा करायला तयार नाही. कामाची मुद्दत संपूर्ण वर्ष उलटली आहे. पाणी पुरवठा विभागाने याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही, असे आपल्याला म्हणायचे नाही. परंतु त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी जाब विचारला आहे की नाही? का प्रश्न सर्वांना पडतो आहे. विचारला असेल तर कामे का पूर्ण झाली नाहीत याची माहिती संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी माध्यमांनी दिली आहे का? असे बरेचसे प्रश्न उपस्थित होत आहे.
जल जीवन मिशनच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाच्या बातम्या अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील झाल्या आहेत. तर काही वृत्तपत्रानद्यारे तालुक्यातील बट्याबोल झालेल्या जल जीवन मिशनकडे जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष घालतील का असा आशावाद व्यक्त करण्यात आला होता, त्याच अनुसंघाने आता उद्या होत असलेल्या जिल्हा आढावा बैठकीत पालकमंत्री यावर चर्चा करून याकामांमध्ये शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे व कामाच्या मुदतीत काम न पूर्ण केल्या मुळे संबंधित गुत्तेदारांवर ते कारवाई करणार का? हीच अपेक्षा आता तहानलेले तालुक्यातील गावे करत आहे.
या आहेत त्या वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या बातम्या
👇👇👇👇
________________________________________
Post a Comment