सौजन्य दीप उजळा
उजळोनी मानसाला !
उजळा विचार आपुले
द्या धीर माणसाला !! धृ. !!
जीवन अमोल आहे
जगणे अमोल आहे
विश्वात कुटुंबाला
बघणे अमोल आहे.....
हृदयात सावली तर
जगण्यात अर्थ आला !! १ !!
भटकू नकोस मित्रा
उद्विग्न नको होवू
हो मित्र भूतलाचा
तू विघ्न नको होवू.....
सत्पात्री दान कर तू
बघ स्वार्थ फार झाला !! २ !!
सर्वांसि प्रेम द्यावे
क्रोधासि संपवावे
आक्रोश दु:ख हिंसा
मनुजास ना दिसावे.....
हातात हात घ्या द्या
सोडून संगराला !! ३ !!
हिंसा अधर्म द्वेष
जाळीलं उभा देश
आतंक अन् सूडाने
होईल काय पेशं.....
विध्वंस काय कामी
या सावरा धरेला. !! ४ !!
लावा सुरूंग तोडा
किल्ले गटागटांचे
हे वर्ण पंथ जाती
माहेर संकटांचे.....
माणूस सर्व काही
का कस्तुरे म्हणाला !! ५ !!
डॉ. विजयकुमार कस्तुरे,
ॲडव्होकेट, चिखली,बुलढाणा
_________________________
Post a Comment