मानवी आरोग्य हीच खरी धनसंपदा - डॉ. श्यामकुमार दुसाने

लोकनेता न्युज नेटवर्क

लासलगाव :- येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव येथे बहि:शाल शिक्षण मंडळ अंतर्गत आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला अंतर्गत 'आरोग्य व निसर्ग' या विषयावर डॉ. श्यामकुमार दुसाने यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय बहि:शाल केंद्रवाहक डॉ. राजेश शंभरकर यांनी करून दिला. डॉ. श्यामकुमार दुसाने यांनी प्रथम पुष्प गुंफताना आरोग्य व निसर्ग कसे एकत्र आहेत. एकरूप आहेत याबद्दल आपले विचार व्यक्त केले. काही वनस्पती विविध रोगाला कशाप्रकारे मुक्त करतात याबद्दल विस्तीर्ण माहिती दिली. आपले शरीर हे 540 कोटीची संपत्ती असून मनुष्य आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेत नाही. या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या शरीराची योग्य काळजी घेतली तर ती व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते. निरोगी आयुष्यासाठी आदर्श जीवनपद्धती महत्त्वाचे असल्याचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ आरोटे यांनी या व्याख्यानमालेचे उद्दिष्ट व महत्त्व यावर प्रकाश टाकला. निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आरोग्याची स्वतःहून काळजी घ्यावी त्यामुळे निरोगी भारताची उभारणी करता येईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.मारोती कंधारे यांनी केले. तर आभार प्रा. स्वप्निल जाधव यांनी मानले.या कार्यक्रमाला प्रा.वाल्मीक आरोटे, प्रा. राजेंद्र कडाळे यांच्यासह 180 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
_________________________

Post a Comment