बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क 

बुलढाणा (ज्ञानेश्वर बुधवत) :- हाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रद्वारा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजागार युवक व युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय, म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. 3 ते 7 फेब्रुवारी 2025 या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे.

          या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा सुशिक्षित बेरोजगार यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे. या प्रशिक्षणात शेळीपालन, कुक्कुट आणि गाय म्हेस पालनाचे तंत्र व प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, शासकीय योजनाची माहितीचे मार्गदर्शन या प्रशिक्षणात तज्ञ व्यक्ती करणार आहे.

         1प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान ५ वी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाईल. प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी दि. 5 फेबुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालया जवळ, चिखली रोड, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय त्यांना ९०११५७८८५४ / ८२७५०९३२०१ या भ्रमणध्वनीवरही संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे. 

______________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in/ 

0/Post a Comment/Comments