श्री बालाजी फिल्डवेल सोसायटीच्या वतीने पेठवडज येथील विद्यार्थ्यांसाठी २६ जानेवारी रोजी बक्षिस वितरण

लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड | बाजीराव गायकवाड :- पेठवडज येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना अभ्यासाची गोडी लागावी तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पेठवडज व परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांचा श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडज च्या वतीने वर्ष २०२५ पासून बक्षीस वितरण समारंभ करण्याचा निर्णय घेतला असून वर्ग १ ते ४ पहिला ५००,दुसरा ३००,तिसरा २००,वर्ग ५ ते ७ पहिला १००० दुसरा ७००,तिसरा ५००,वर्ग ८ ते ९. पहिला २०००,दुसरा १५००,तिसरा १००० वर्ग १० वा पहिला ५००० दुसरा, ३०००, तिसरा २००० गुणवत्तेनुसार पास झालेल्या विद्यार्थ्यांस प्रोत्साहन बक्षिस म्हणून २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता सोसायटीच्या अध्यक्षा सौ.सुनिता अशोकराव डावकोरे व श्री अशोक शामराव डावकोरे तांत्रिक सल्लागार यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.याशिवाय दहावीत ७५% टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांस प्रत्येकी १०,००० हजार रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. 
       आपणांस कळविण्यात येत आहे कि वरील सर्व पात्र विद्यार्थ्यांची नावे उद्या दुपार पर्यंत नावे नोंदवावी .जेणेकरून आम्हांस नियोजन करण्यात मदत होईल. यामध्ये पुनर्वसन, इंदिरानगर विठ्ठल मंदिर ,चुडाजीची वाडी, गाडगेबाबा नगर, जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज या शाळांचा समावेश आहे.तेव्हा या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांनी या बक्षीस वितरण सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडजच्या वतीने कळविण्यात आले आहे.
_________________________

0/Post a Comment/Comments