बुलढाणा(ज्ञानेश्वर बुधवत) :- राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मस्थळी आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दर्शन घेवून अभिवादन केले.
जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती झाल्यानंतर मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यात दाखल होताच पहिल्यांदा राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट देवून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीस भेट देवून अभिवादनही केले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार मनोज कायंदे, माजी खासदार सुखदेव काळे, माजी आमदार तोताराम कायंदे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
_________________________
Post a Comment