भोकर पत्रकार संघाकडून जाहीर निषेध
मालेगाव :- खा. अशोकराव चव्हाण भोकर येथे गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये अधिकाऱ्याशी चर्चा करीत असताना काही पत्रकार उपस्थित होते. त्यावेळी खा. अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांना बाहेर जाण्याचे फर्मान सोडले. नेहमी संयमी भूमिका घेणारे खा. अशोकराव चव्हाण आज मात्र बैठकीत चांगलेच संतापले. एक नाही दोन वेळा सांगत संताप व्यक्त केला. त्यामुळे अखेर पत्रकार बाहेर गेले अन् खा. चव्हाणांचा जाहीर निषेध केला.
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणराज रिसॉर्ट येथील सभागृहात भोकर तालुका पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भोकरचे आ.श्रीजया यांचीदेखील उपस्थिती होती. सदरील बैठक सुरू असताना अचानक खा. अशोकराव चव्हाण यांनी ध्वनिक्षेपकावरून सभागृहातील उपस्थित पत्रकारांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. असे कृत्य लोकप्रतिनिधींसाठी अशोभनीय असून माध्यम प्रतिनिधींचा अपमान आहे. या घटनेचा भोकर तालुका पत्रकारांतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे संबंधित लोकप्रतिनिधीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून या निवेदनावर राजेश वाघमारे, बी.आर. पांचाळ, एल.ए. हिरे, जयभीम पाटील, बाबुराव पाटील यांच्यासह अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
________________________
Post a Comment