गेवराई शहरात अपघात, ट्रकने दुचाकीला उडविले

लोकनेता न्यूज नेटवर्क

गेवराई :- बीड हून गेवराई कडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने [एम एच 20,डब्लू 8568] दुचाकीस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. घटना गुरूवार ता. 23 रोजी, झम झम फ्यूल पंपा जवळच्या बायपास राष्ट्रीय महामार्गावरसकाळी दहा वाजता घडली. दरम्यान, ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वार बचावला आहे. मात्र, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दुचाकी ट्रकच्या उजव्या बाजुच्या चाकाखाली गेली. अपघातात जखमी झालेल्या तरूणास उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीस पथक दाखल झाले होते. गेवराई च्या बीड कडे जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गा जवळचा बायपास हा, अपघाताला आमंत्रण देणारा त्रिकोणी रस्ता आहे. त्यामुळे, या ठिकाणी नेहमीच अपघातात होतात.

_________________________

0/Post a Comment/Comments