सिंदखेड राजा तालुक्यांतील शेतरस्त्यांचे प्रकरण आता तातडीने मार्गी लागणार - तहसिलदार अजित दिवटे

तीन वर्षांपूर्वी चे वाद मिटल्याने शेतकरी वर्गात आनंद..


लोकनेता न्युज नेटवर्क
  • सिंदखेड राजा | ज्ञानेश्वर बुधवत :- मातृतीर्थ सिंदखेड राजा तहसिल कार्यालयात मागील २-३ वर्षा पासून अनेक शेतकऱ्यांनी शेत रस्त्यांची प्रकरणे दाखल केली असून मागील काही वर्षात तहसील कार्यालयाच्या गैरसोई व अधिकारी कर्मचारी यांच्या कमतरते मुळे हे प्रकरण आहे त्याच स्थिती मध्ये होती. यामुळे शेतकरी वर्गात असंतुष्टा बघण्यास मिळू लागली होती परंतु आता रस्त्यांची प्रकरण लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती तहसीलदार अजित दिवटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आठवड्यातील १-२ दिवस शेतरस्त्यांच्या कामासाठी देऊन घटनास्थळी जात आपआपसात वाद मिटवण्यासाठी सर्व प्रथम प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मागील ३ वर्षा पासून दाखल केलेली प्रकरण एक एक करून लवकरच मार्गी लागणार आहे. त्या मध्ये खाजगी रस्ते तर काही शिव, वाटा पांदन रस्त्यांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
       
तालुक्यातील सवडत जवळील गुंजामाथा शिवारातील सन 2022-23 पासून सिंदखेडराजा तहसील कार्यालयात शेत रस्ताचे प्रकरण दाखल करण्यात आले होते मात्र तारीख 21 जानेवारी रोजी सिंदखेड राजा चे तहसीलदार अजित दिवटे यांनी घटनास्थळी जाऊन, दोन्ही तक्रार कर्ते यांची भेट घेऊन सदर शेत रस्ता आपसात सोडवून शेत रस्ता झाल्यास शेतकऱ्यांना होणारे फायदे समजावून सांगितले, व या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही शेतकऱ्यांना होणारी आर्थिक हाणी व उत्पादनात होणारे तोटे समजावून सांगितले.  दोन्ही पक्षकारांना विश्वासात घेऊन शेत रस्ता आपसात खुला करण्याची माहिती दिल्याने हा शेतरस्ता खुला करून दिला.  
      याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. 21 जानेवारी रोजी सिंदखेड राजा मधील मौजे गुंजामाथा शिवारातील तेजराव त्र्यंबक  देशमुख व दत्तात्रय देशमुख व इतर यांचा सण 2022-23 तीन वर्षापासून रस्ता प्रकरणी तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे शेत रस्ता चे प्रकरण सुरू होते. या प्रकरणी तहसीलदार यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन समजोता करून प्रकरण मोक्यावर मिटवले व रस्ता खुला केला आहे. यावेळी उपस्थित मंडळ अधिकारी साखरखेर्डा ग्राम महसूल अधिकारी संजय शिंगणे, विश्वास शेळके, काकड साहेब, महसूल सेवक अविनाश तुपकर, शुभम खरात, विजू राजपूत, राजू खरात, आकाश माघाडे व गावातील प्रतिष्टीत व्यक्ती हजर होते.
_________________________

0/Post a Comment/Comments