सिंदखेड राजा तालुक्यात अग्रो स्टॅक योजनेच्या कॅम्पचे आयोजन

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- शेंदुर्जन येथे शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी ॲग्री स्टॅक योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आला होत. तहसीलदार अजित दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शेकडो शेतकरी उपस्थित होते. 
       शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी येत्या आर्थिक वर्षामध्ये शेतकरी ओळख क्रमांक हा अनिवार्य केला जाणार असल्याने यासंदर्भात ॲग्री स्टॅग योजना शासनाने आणलेली असून या योजनेची माहिती आणि महत्त्व तहसीलदार अजित दिवटे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली. तसेच फार्मर आयडी कशा पद्धतीने तयार करायचा यासाठी सी.एस.सी चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकरी बांधवांचे फार्मर आयडी तयार करून प्रतिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आले. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर जास्तीत जास्त फार्मर आयडी तयार करून घेणे बाबत तहसीलदार यांनी उपस्थितांना आवाहन केले. 
       शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केल्याबद्दल दिनकरराव देशमुख माजी जिल्हा परिषद सभापती यांनी महसूल प्रशासनाचे कौतुक केले. या कॅम्पला एस. एस.साळवे, मंडळअधिकारी, विठोबा शिंगणे सरपंच शेंदुर्जन, सुधाकर पाटील माजी सरपंच, संतोष शिंगणे माजी सरपंच, बबनराव सानप माजी उपसरपंच, प्रकाश चव्हाण माजी उपसरपंच, एस.पी.शिंगणे पत्रकार या सह परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. तसेच ज्ञानेश्वर खरात,आनंद राजपूत, रवींद्र गुंजकर,ज्ञानेश्वर दांडगे ग्राम महसूल अधिकारी,अविनाश गाडे,राजू खरात व आकाश माघाडे महसूल सेवक यांनी सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद वाकदकर ग्राममहसूल अधिकारी यांनी केले तर आभार सुशील शीलवंत यांनी ग्राममहसूल अधिकारी यांनी मानले.
_________________________

0/Post a Comment/Comments