1 तास 25 मिनिटे 25 सेकंद नॉन-स्टॉप स्केटिंग करत दोन वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

"लोकनेता न्युज नेटवर्क

आळंदी देवाची (इम्रान हकीम) :-कृष्णानगर,चिंचवड स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, चिंचवड स्केटिंग रिंग (पीसीएमसी) येथे अमेथिस्ट स्पोर्ट्स अकॅडमी चिंचवड च्या वतीने आयोजित कार्यक्रमात 1 तास 25 मिनिटे 25 सेकंद स्केटिंग करत दोन वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यात आली. हा ऐतिहासिक उपक्रम लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मान्यता प्राप्त झाला आहे. हा 26 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:00 ते 6:25:25 या वेळेत पूर्ण करण्यात आला.

    या उल्लेखनीय कामगिरीसाठी पुढील स्केटर्सनी सहभाग नोंदवला: सफियान बंदेनवाज चौधरी, रेयांश किरण सुपेकर, सीनाय मनीष सर्की, श्रावणी रितेश गायकवाड, रुद्र प्रयागराज इंगळे, स्वरूप शशिकांत पवार, स्वामिनी सतीश शिर्साठ, जिक्रा असलम खान,आयशा सोनल अदसुळे, विवेक मारुती कदम, रुद्रांश यतीन देशमुख,साची भारत असावा,अन्वयी अजय सोंडकर,किंजल तुषार जैखेडकर, अद्वित सरकार,क्रिश जीग्नेश धोराजिया, सुनील यल्लप्पा केंगरे, श्रीराज बाळासाहेब पाटील, आयुष संजोग मोहोड, समर्थ संतोष म्हेत्रे, सुनिता यल्लप्पा केंगरे एकूण 21 विद्यार्थ्यानी या उल्लेखनीय कामगिरीसाठी सहभाग नोंदविला

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे विनोद जगदाळे स्केटिंग गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर यांच्या हस्ते करण्यात आले. रेकॉर्ड सुरू झाल्यापासून समाप्त होईपर्यंत, पालक आणि प्रमुख पाहुण्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्केटर्सना प्रोत्साहन दिले.स्केटर्सनी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने स्केटिंग करत हा विक्रम प्रस्थापित केला. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीराज सर प्रमुख पाहुणे आणि पालकांच्या हस्ते स्केटर्सचा सत्कार करण्यात आला.

_________________________

0/Post a Comment/Comments