लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- मातृतीर्थ तालुक्यातील 82 कोटी रुपयांची जलजीवन ची कामे चालू असून त्यात बट्याबोळ करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केल्याचा प्रकार पुढे आला होता. यांच्या बातम्या तालुक्यातील नामांकित वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्या आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाच्या तक्रारी देखील अनेक नागरिकांनी केलेल्या आहेत. मात्र यावर विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे चौकशी केलेली नाही.
तालुक्यात झालेल्या कामाची बिल किती निघली आहेत या संदर्भात माहिती देण्यासाठी सिंदखेड राजा उपविभागीय अभियंता मालोकर यांना फोन केला असता. आज बाहेर, मीटिंग ला आहे. उद्या या असे उडवा उडविची उत्तरे त्यांनी वृत्तपत्रांच्या संपादकांना, पत्रकारांना दिली. महिना उलटूनही आज पर्यंत त्यांनी माहिती देण्याचे कष्ट घेतले नाही. त्यांच्या कार्यालयाला भेट दिली असता ते अनेक वेळा हजर देखील नसल्याचे कळाले. मात्र उपविभागीय अभियंता मालोकर यांना माहिती देण्यास हरकत असेल तर त्यांनी तसे सांगितले का नाही? केवळ नंतर कॉल करतो असे असे उत्तरे दिली.
१० टक्यात सेटलमेंट झाल्याची सूत्रांची माहिती
जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी विश्व फाउंडेशन मार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांना करण्यात आली होती व पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत जलजीवन मिशनचा मुद्दा घेतल्या ची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आता १० टक्यात आर्थिक देवाण घेवाण होणार असल्याची अधिकृत सूत्रांकडून माहिती. वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना मिळाली. परंतु ही माहिती नावे न छापण्याच्या अटीवर सूत्रांनी दिली आहे. सदरील १० टक्के रक्कम ही कोणाकडे द्यायची ही माहिती अधिकृत नसली तरी जिल्ह्यातील एका वरिष्ठ कार्यकर्त्याकडे दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या १० टक्याची सेटलमेंट झाल्यास तालुका तहानलेलाच राहील यात मात्र आता शंका नाही.
_________________________
Post a Comment