कळका येथील बाजीराव पाटील यांची दै.लोकनेता च्या मराठवाडा विभागीय संपादक पदी निवड


लोकनेता न्युज नेटवर्क 

नांदेड :- जिल्हाचे दैनिक लोकनेता पेपर चे निर्भिड पत्रकार गरीबांचे कैवारी कळका ता.कंधार जि.नांदेड येथील भुमीपुत्र बाजीराव पाटील गायकवाड यांची मराठवाडा विभागीय संपादक म्हणून दैनिक लोकनेता चे मुख्य संपादक ज्ञानेश्वर बुधवत व संपादक ज्ञानेश्वर मुंडे यांनी सामाजिक, राजकीय, भ्रष्टाचार, गुन्हे, प्रशासकीय बातम्या मराठवाडा विभागातील चालू घडामोडी व अन्य सर्व प्रकारच्या बातम्या विविध समस्या जनतेपर्यंत पोहोचवून शासन आणि प्रशासन यांच्या कडे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मराठवाडा विभागीय संपादक या पदावर नियुक्ती केली आहे.या महान कार्यात २ फेब्रुवारी २०२५ रोजी सहभागी करून दैनिक लोकनेता पेपर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावांपर्यत प्रतिनिधी च्या माध्यमातून पेपर पोहचवण्यासाठी मुख्य संपादक ज्ञानेश्वर बुधवत यांनी म.वि.संपादक पदाची जबाबदारी दिली असून झालेल्या निवडीबद्दल खालील मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.! कळका नगरीचे भुमिपत्र कंधार लोहा विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर (कळकेकर), दक्षिण नांदेड विधानसभेचे आमदार श्री आनंदराव पाटील बोंढारकर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मारोतराव पाटील गायकवाड कळकेकर, समाज उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारोतीराव निवृत्तीराव पाटील घोरबांड, व्हिपीके उद्योग समूहाचे सर्वेसर्वा चेअरमन श्री मारोतराव पाटील कवळें गुरुजी, श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी चे तांत्रिक सल्लागार श्री अशोकराव डावकोरे, परफेक्ट इंग्लिश स्कूल चे सर्वेसर्वा गोविंदराव केंद्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, पत्रकार, शिक्षक,पोलिस, महसूल विभाग, गावकरी मंडळी,वकील,सरपंच,चेअरमन,उपसरपंच,व्हा.चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य ,स्नेही पाहुणे मंडळी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

_________________________

0/Post a Comment/Comments