दैनिक लोकनेता पेपर चा इफेक्ट २४ तासांच्या आत आरोपींवर गुन्हे दाखल

एक एकर शेतातील ऊस उपटुन नुकसान केलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल!

लोकनेता न्युज नेटवर्क

उमरी :- मौजे कुदळा ता. उमरी जि. नांदेड येथील शेतकरी किशनराव सटवाजी गायकवाड यांच्या शेतात जामगाव शिवारातील गट क्रं. १९७ क्षेत्र ०.४० हे. मध्ये दि २०/११/२०२५ रोजी ऊसाची लागवड केलेल्या दोन महिन्यांच्या उसाचे पिक मुळा सकट उपटून पन्नास हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केलेले आहे. सदरील घटना दि ३०/०१/२५ रोजी दुपारी ४ वाजता गावातील शेत शेजारी साहेबराव वामन भेरजे, संतोष वामन भेरजे (भाऊ) , गौत्तम वामन भेरजे (भाऊ), धमदिप वामन भेरजे (भाऊ) इत्यादी संगनमत करून मागील जुन्या भांडणाचा मनात राग धरून गायकवाड यांच्या शेतातील ऊस मुळा सकट उपटून पन्नास हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. सदरील आरोपी विरोधात किशनराव गायकवाड कुदळेकर यांनी उमरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी सोबत पोलिसाचा फौज फाटा घेऊन दि. ३१/०१/२५ रोजी शेतात घटना स्थळीं भेट देऊन संबंधित वरील आरोपींवर दुपारी १५.१३ वाजता बि.एन.एस २०२३ नुसार कलम ३२४(४), ३२४(५),३५२,३५१(२),३५१(३)३(५) प्रमाणे इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले असून सिंधी बिट जमादार गोविंद शिंदे हे आरोपींचा शोध घेत आहेत. यामागे राजकीय षडयंत्र असुन गावातील सुवर्ण जातीच्या राजकीय पुढाऱ्यांचा हात असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून गायकवाड यांचा दावा धरून अनेक वर्षांपासून यांना त्रास देण्यात येत असुन आज पर्यंत सोयाबीनचा ढग जाळणे, दोन एकर मधील ऊसाला आग लावून जाळणे, दलित समाजकंटकां मार्फत मुलगा व गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ले करणे, शेतातील विहिरीच्या पाण्याची ५ एच पी मोटारची चोरी करणे, पाईप व वायरची चोरी करणे, शासन दरबारी व समाजात गायकवाडची बदनामी करून अपमानीत करणे इत्यादी प्रकारचा सामाजिक, मानसिक व आर्थिक छळ करीत असुन वरील लोकांपासून गायकवाड व गायकवाड यांच्या परिवाराच्या जीवीतास धोका असुन वरील सर्व प्रकरणात या आरोपींचाच हात आहे. त्यांची कसुन चौकशी करून त्यांचेवर कारवाई करावे व त्यांना अटक करावे. गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये अशी मागणी केलेली आहे.

 _________________________

0/Post a Comment/Comments