लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा|ज्ञानेश्वर बुधवत :- सिंदखेडराजा तालुक्यातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना व अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत सर्व शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी28 फेब्रुवारी पर्यंत सर्व शिधापत्रिका धारकांनी (सत्यापन) करणेबाबत विशेष मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांना आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी. 28 फेब्रुवारी पर्यंत करणे बंधनकारक असून सर्व लाभधारकानी इ केवायसी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार अजित दिवटे यांनी केले आहे आहे.
महाराष्ट्र शासन अंतर्गत तहसिल कार्यालय, सिंदखेड राजा अंतर्गत सर्व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत सर्व शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी (सत्यापन ) करणेबाबत विशेष मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांना आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. आपली शिधापत्रिका आणि आधार कार्ड घेवून दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पूर्वी सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांची स्वस्त धान्य दुकानात जावून ई-केवायसी (सत्यापन) पूर्ण करून घ्यावी. जे शिधात्रिकाधारक ई- केवायसी करणार नाही, त्यांचे धान्य बंद झाल्यास अथवा अपात्र ठरल्यास स्वतः शिधात्रिकाधारक ह्यास जबाबदार राहतील. त्यामुळे पुनश्च सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व शिधात्रिकाधारकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहू नये याकरिता त्वरित आपल्या स्वस्त धान्य दुकानात जावून ई-केवायसी (सत्यापन) पूर्ण करून घ्यावे व प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन तहसीलदार अजित दिवटे यांनी केले आहे.
_________________________
Post a Comment