अहिल्यानगर(ज्ञानेश्वर बुधवत) :- येथे संपन्न झालेल्या दि.०९-०२-२०२५ - च्या १६ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ख्यातनाम साहित्यिक व कवयित्री मा. संजीवनी तडेगावकर यांना हार्दिक शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी, साहित्यिक क्षेत्रातील कथाकथनास्तव अंतर्राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित व मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ.बबनराव महामुने, छ. संभाजीनगर, तसेच सामाजिक सेवेनिमित्ताने अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त ज्येष्ठ कवी डॉ. डी. व्ही. खरात सर, चिखली, बुलढाणा यांच्या सह भावकवी आयुष्मान अंकुश पडघान, बोरगाव काकडे, चिखली तथा बहुजन साहित्य संघ, चिखली चे अध्यक्ष ज्येष्ठ कवी व हरहुन्नरी कलावंत, लेखक , गायक, अभिनेता, दिग्दर्शक व अनेक दशकांच्या सामाजिक कार्यास्तव मानद डॉक्टरेटने सन्मानित डॉ. विजयकुमार कस्तुरे, चिखली यांनी संमेलन स्थळी त्यांची सदिच्छा भेट घेवून सर्वांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. त्यावेळी ज्येष्ठ कवी मा. पंडीतराव तडेगावकर हे सुद्धा उपस्थित होते.
_________________________
Post a Comment