बुलढाणा (ज्ञानेश्वर बुधवत) :- दि.१२-०२-२०२५ मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे, बहुजन साहित्य संघ, चिखली, जि. बुलढाणा च्या वतीने दि. ३१ मार्च, २०२५ रोजी आयोजित तसेच बहुचर्चित सहाव्या बहुजन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्विकारावे यास्तव, दि. ११ - ०२ - २०२५ रोजी संघाचे सचिव तथा सामाजिक सेवेसाठी साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. डी. व्ही. खरात सर तसेच भावकवी अंकुश पडघान यांच्या सह अध्यक्ष तथा आपल्या प्रदीर्घ समाजकार्यामुळे अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांनी सबंध भारतभर सुप्रसिद्ध असलेल्या तथा उर्दू शायरीस वाहून घेतलेल्या आणि यशस्वी शल्यचिकित्सेसाठी ख्यातनाम असलेल्या बुलढाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश गायकवाड यांची भेट घेऊन, नुकत्याच अबूधाबी येथील गौरवास्पद कार्यक्रमात सन्मानित झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून उपरोक्त नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी स्विकारावे यास्तव सविस्तर चर्चा करून नम्र विनंती सुध्दा केली. आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याकारणाने आज ब. सा. संघाचे अध्यक्ष, डॉ. विजयकुमार कस्तुरे, सचिव डॉ.डी. व्ही. खरात सर, उपाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कवी तथा आपल्या समृध्द परकायाप्रवेशी कथाकथनासाठी साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त कथाकार डॉ. बबनराव महामुने, छ. संभाजीनगर, सल्लागार तथा ग्रामीण साहित्य चळवळ, बुलढाणा चे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक कवी कडूबा बनसोड, नागनगाव, ता .देऊळगाव राजा, सल्लागार तसेच ज्येष्ठ साहित्यिक कवी व संपादक तथा सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते प्रा.भास्कर इंगळे, बुलढाणा, सल्लागार व चळवळीतील सक्रिय धडाडीचे सेनानी एस्. बी. शिंदे आणि पदाधिकारी अंकुश पडघान असे ब. सा. संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या सर्व मान्यवर पदाधिकारी मंडळींनी मिळून, ब. सा.सं. च्या वतीने उपरोक्त नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आल्याबद्दल चे सर्वांच्या सह्यांचे लेखी पत्र, डॉ. गणेश गायकवाड यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान व सत्कार केला तसेच हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ.गणेश गायकवाड यांनी वरील प्रमाणे उदगार काढले.
त्यांच्या या निवडीबद्दल सबंध महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील साहित्यिक, नागरिक तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
_________________________
Post a Comment