श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी कोणाच्याही धमकीमुळे कामे थांबवणार नाही - श्री अशोकराव पाटील डावकोरे

लोकनेता न्युज नेटवर्क 

नांदेड (बाजीराव पाटील गायकवाड) :- पेठवडज नगरीमध्ये श्री.अशोकराव शामराव डावकोरे हे १९८३ पासून सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांनी सांगितलेल्या मागील आठवणी असतील तेवढ्या संदर्भासह प्रसंग सांगत आहोत. लवकरच त्यावर लेखी स्वरूपात नोंदी घेऊन पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.ते म्हणाले आम्हांस जाहीर करण्यात आनंद वाटतो कि शासकीय सेवेतील जवळपास अठ्ठावीस वर्षांत मला प्रत्येक वर्षी अ+सी.आर. म्हणजेच अतिउत्कृष्ट मानांकन प्राप्त आहेत. मी आता पर्यंत अनेक अडचणींवर मात करीत इथपर्यंत आलो आहे. 

हे पेठवडज नगरीतील तमाम जनतेस चांगलेच माहित आहे.मी यापुढे कोणाच्याही धमकी किंवा कोणाच्याही इशाऱ्यामुळे आमची कामे थांबविण्यात येणार नाहीत .राहिला प्रश्न निवडणूक रिंगणात उतरायचा. निवडणूक लढवण्याचा पेठवडज गावातील नागरिक म्हणून कुणालाही तो अधिकार आहे . 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तो हक्क बहाल करून ठेवला आहे.काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही.जनतेच्या दरबारात जाऊन आशीर्वाद मागूत. जनतेस ठरवू द्या.आपण आम्हांस ज्ञान शिकवू नये.असे त्यांनी दिलेल्या प्रकट मुलाखतीत सांगितले आहे.श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी पेठवडज आपले सामाजिक कार्या बरोबरच धार्मिक कार्यात सहभागी होऊन सहकार्य करीत राहिल असे त्यांनी सांगितले आहे.

_________________________

0/Post a Comment/Comments