शिरुर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

कंपनीने आर्थिक व्यवहार फसवणुकीचा करून 22 शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या

लोकनेता न्यूज नेटवर्क

उमरी | महेश पडोळे :- तालुक्यातील मौजे शिरूर येथे सन 2023ते 2024 मध्ये वेस्टर्न अँड फोर्स प्रायव्हेट लिमिटेड इंडिया ह्या सौर ऊर्जेच्या कंपनीची उभारणी करण्यासाठी कंपनीचे एजंट दीपक शंकर नलवाडे मु. पो. जखिनवाडी तालुका कराड. जि सातारा. यांनी शिरूर येथिल शेतकऱ्याची जमीन प्रति एकर 10 लाख रुपये प्रमाणे ऊर्जा प्रकल्पासाठी विकत घेऊ व कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीमध्ये रोजगार देऊ असे शिरूर येथील शेतकऱ्यांना आश्वासन दिले त्यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून तेथील 22 शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या सौर ऊर्जा प्रकल्पास दिल्या दिल्यावर त्या ठिकाणी प्रकल्प उभारणी करण्यात आला.पण याच कंपनीचे एजंट दीपक शंकर नलवाडे, नितीन भाऊसाहेब जाधव , निलेश लक्ष्मण गायकवाड यांनी शेतकऱ्याची दगाफटका केला व जमिनीची रजिस्ट्री मात्र चार लाख 50 हजार प्रमाणे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. उर्वरित पाच लाख 50 हजार रक्कम मागण्यास कंपनीमध्ये गेल्यास कंपनीचे एजंट अरेरावेची भाषा करून जीवे मारण्याची धमकी त्या शेतकऱ्यांना देत असल्याचे तेथील शेतकरी आपल्या तोडून सांगत आहेत. या सर्व बाबी बद्दल तेथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. कंपनीच्या मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ऊर्जा कंपनी बंद करण्यात यावे यासाठी शेतकरी उमरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत . ऊर्जा कंपनीस जमीन विकणारे शेतकरी खालील प्रमाने नामे 1. केरबा मारुती उसेवाड, २. शेषाबाई मारुती उसेवाड,
३. दत्ता केरबा उसेवाड, ४. जनाबाई दत्ता उसेवाड, ५ आनंदा करबा उसेवाड
६. पंढरी तुकाराम वंगलवार, ७. दिगंबर गणपती खतगाये, ८. लिंगराम गणपती खतगाये, ९. शिवराज दिगांबर खतगाये,
१० पुंडलिक सखाराम कोंडेवाड, ११. कौशल्याबाई मारुती कोंडेवाड, १२. मारुती पुंडलिक कोंडेवाड, १३. रेखाबाई कोंडीबा कोंडेवाड, १4. सुरेखाबाई नारायण रोडेवाड , १5. माधव दिगंबर हुसेवाड, १6. शेषाबाई माधव चोपवाड , 17. गंगाधर लक्ष्मण डुबुकवाड, १8. संतोष लक्ष्‍मण डुबुकवाड, 19. आनंदीबाई मारुती डुबुकवाड, 20. रत्नाकर बिरदे, २1. जयशिला संदिप बिरदे या शेतकऱ्यांनी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली आपली जमीन दीपक शंकर नरवाडे यांच्या खोट्या आश्वासनास बळी पडून आपली जमीन विकली व सदर जमीन विकण्यास ज्यांनी प्रवृत केले ते एजंट 1. नितीन भाऊसाहेब जाधव , 2. निलेश लक्ष्मण गायकवाड, 3. दीपक शंकर नरवाडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी शिरूर येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास उमरी तहसील कार्यालय बसले आहेत. त्यांच्या अर्जाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
_________________________

0/Post a Comment/Comments