बहुजन साहित्य संमेलनामध्ये उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा :- अवघ्या काही दिवसांवर बहुजन साहित्य संघ चिखली आयोजित बहुजन साहित्य संमेलन, २०२५ येवून ठेपले असता संघाच्या पदाधिकाऱ्यांची संमेलन यशस्वीते साठी अविरत धावपळ सुरू असून, येत्या ३१ मार्च, २०२५ ला मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या सुंदर व रमणीय परिसरामधे संमेलनामध्ये फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे पाईक, तसेच तळागाळातील व दरीकपारींमधील अतिमागास वर्गाच्या, विकासापासून कोसों दूर जनतेला कल्याणाच्या वाटेवर घेवून येण्याच्या आपल्या कल्याणकारी कामाद्वारे जनसामान्य व्यक्तीच्या मनावर आगळावेगळा ठसा उमटविणारे अधिकारी व्यक्तिमत्त्व अर्थात मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीचे उपविभागीय अधिकारी मा. संजय खडसे यांची बहुजन साहित्य संघाच्या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती लाभणार असून तसे आग्रही निमंत्रण, ब. सा. संघाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे, उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने तथा पदाधिकारी व दैनिक लोकनेता चे संपादक आणि इतर मान्यवर यांनी, मां.खडसे साहेब यांना दि. १२-०३-२०२५ रोजी विनंती पूर्वक देऊन उपस्थितीसाठी आवाहन केले व त्यांनी सुध्दा आनंदाने ते स्विकारले.
     या वेळी बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे, संघाचे उपाध्यक्ष बबनराव महामूने, संघाचे संयोजक तथा दैनिक लोकनेता चे संपादक ज्ञानेश्वर बुधवत आदी मान्यवर उपस्थित होते.
_________________________

0/Post a Comment/Comments