बीड च्या खोक्याची उर्फ सतिश भोसलेची सिंदखेड राजा तालुक्यातील पीडित व्यक्तीला जबर मारहाण

गुप्त अंगात पेट्रोल टाकणाऱ्या आरोपींना फाशी द्या पीडित व्यक्ती ची मागणी

लोकनेता न्युज नेटवर्क 

 

सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला कुख्यात गुंड 'खोक्या' उर्फ सतिश भोसले याने एका पीडित व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा पीडित व्यक्ती सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड येथील रहिवासी असून, ते जेसीबी व पोकलँडचे चालक आहेत. 'खोक्या' व त्याच्या गुंडांनी अवघड जागेत पेट्रोल ओतले, अनन्वीत अत्याचार केले, तसेच बॅटने तळपायावर मारहाण केली. या सर्व गुंडांना फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी कैलास वाघ यांनी केली आहे.
    बीड येथील अमानवीय मारहाण व अत्याचार प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक व निकटवर्तीय कुख्यात गुंड 'खोक्या' उर्फ सतीश भोसले याने दीड वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या घटनेतील मार खात असलेले कैलास वाघ हे सिंदखेडराजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी आहेत. 'त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी झालेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. त्यांच्या आईनेदेखील बीडच्या गुंडांनी पिस्तुल दाखवून पोराला पळवून नेले होते, असे सांगितले.
       पीडित कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकल्यांडवर ऑपरेटर म्हणून काम करीत होते. त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ हे घरी माहेरखेडला निघून आले होते. तेव्हा बीड जिल्ह्यातील काही सात ते आठ गुंड कैलासच्या घरी येऊन त्यांना बीड जिल्ह्यात घेऊन गेले व तिथे बेदम मारहाण केली. अतोनात दहा दिवस अत्याचार केले, हालहाल केले. त्यानंतर कैलास वाघ हे तेथून कसेबसे पळून आले व आपला जीव वाचविला होता. तेव्हाच सिंदखेड राजा पोलिसात कैलास वाघ यांनी तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सिंदखेड राजा पोलिसदेखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता आमदार सुरेश धस यांना भेटायचे आहे व त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचे कैलास वाघ हे सांगत आहेत. तसेच जर आरोपींना शिक्षा झाली नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारादेखील कैलास वाघ यांनी दिला आहे.

तक्रार दाखल करूनही सिंदखेड राजा पोलिसांचे गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष

      सिंदखेड राजा पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करूनही संबंधित पोलिस स्टेशन च्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे सिंदखेड राजा पोलीस आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बीड वरून येऊन पिस्तूल चा धाक दाखवत पीडित व्यक्तीला दोन वेळा सिंदखेड राजा तालुक्यातून 2 वेळा उचलून नेल्या जाते तरी सिंदखेड राजा पोलीस मात्र झोपेचे सोंग घेत असेल तर या प्रकाराला काय म्हणावे? पीडित व्यक्तीच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की घरी येऊन पिस्तूल दाखवून महिलेच्या मुलाला बीडच्या गुंडांनी उचलून नेले. त्यानंतर तक्रार देऊनही पोलिसांनी दखल घेतली नाही. आता या गुम्हासह पोलीस अधीक्षकांनी सिंदखेड राजा पोलिसांची चौकशी करून मागील २ वर्षात किती पीडित व्यक्तींना सिंदखेड राजा पोलिसांनी अन्याय सहन करायला लावलाय, आणि यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प बसली आहे याची चौकशी देखील व्हायला हवी.
_________________________

0/Post a Comment/Comments