सर्व समाजाच्यावतीनेबंदचे
आवाहन; आरोपींना फाशीची मागणी!
देऊळगाव राजा :- मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे माणुसकीला काळिमा फासणारे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर सर्व समाजातून तीव्र संतापाची लाट उसळली असून, या नृशंस हत्याकांडाच्या निषेधार्थ व आरोपींना फाशी व्हावी, या मागणीसाठी आज (दि. ५) रोजी देऊळगावराजा कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही मानवतेला काळिमा असून, त्याबद्दल सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे हत्याकांड अतिशय नृशंस असल्याचे व्हायरल झालेल्या फोटोंवरून दिसून आले आहे. त्यामुळे सर्व समाजाच्यावतीने आज (दि. ५) देऊळगावराजा शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. शहर पूर्ण बंद ठेवून व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहनही सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे. हा स्वयंस्फूर्त बंद असल्याने त्याचे कुणीही आयोजक नसल्याचे पुढे येत आहे. _________________________
Post a Comment