बुलढाणा :- सर्वदूर ख्याती प्राप्त बहुजन साहित्य संघ, चिखली, जिल्हा बुलढाणा च्या वतीने, मातृतीर्थ अर्थात मा जिजाऊ यांची माहेर नगरी सिंदखेडराजा येथे दि. ३१ मार्च, २०२५ रोजी आयोजित राज्यस्तरीय सहाव्या बहुजन साहित्य संमेलनाच्या उदघाटनाची जबाबदारी भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रालयातील आयुष मंत्री मा. प्रतापराव जाधव यांनी आवर्जून स्विकारली असून ब. सा. संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक कवी कलावंत आणि समर्पित सामाजिक सेवेसाठी सातासमुद्रापारची मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक कवी आणि आपल्या परकायाप्रवेशी कथाकथनासाठी साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. बबनराव महामुने, छ. संभाजीनगर, यांच्या सह सामाजिक व मानवीय सेवाभावी कार्यास्तव अमेरिकेतील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित, ब. सा. संघाचे सचिव डॉ. डी.व्ही. खरात, चिखली, ब. सा. सं. चे सल्लागार तथा संपादक, प्रा. भास्कर इंगळे,बुलढाणा आणि ग्रामीण भागातील मौजे बोरगाव काकडे, ता. चिखली येथील भावकवी म्हणून प्रसिद्ध असलेले तथा ब. सा. सं. चे सह संघटक आयुष्मान अंकुश पडघान यांनी त्या संबंधीचे हार्दिक निमंत्रण पत्र आज दि. २८-०२-२०२५ रोजी मा. मंत्री महोदय बुलढाणा येथे आले असता, जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या विशेष कक्षामधे, त्यांना दिले. आणि मा. मंत्री महोदयांनी सुध्दा अत्यंत आनंदाने सदर निमंत्रणाचा स्विकार करून सहर्ष, मातृतीर्थावर संपन्न होत असलेल्या उपरोक्त बहुजन साहित्य संमेलनाच्या उदघाटनासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे मन:पूर्वक आश्वासन दिले.
_________________________
Post a Comment