शितलताई झाल्या सरपंच, सुधारला गावाचा प्रपंच!

लोकनेता न्यूज नेटवर्क

गेवराई :- शूर व कर्तृत्वान स्त्रियांची ऐतिहासिक परंपरा तसेच सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याशिवाय, स्त्री ही एक मुलगी, भगिनी, पत्नी, आई व शिक्षिका तर असतेच, पण प्रसंगी ती दुर्गेचा अवतार धारण करते. हा शौर्याचा वारसा धोंडराई या गावची सरपंच शितल साखरे ह्या जोपासत आहेत. त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरपंच म्हणून गावाचा विकास करत आहे. तसेच धोंडराई सर्कल मधील महिलांसाठी त्या विशेष कार्यक्रम आयोजित करून महिलांसाठी काम करत आहेत. शिवाय गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी कधीही पुढे अग्रेसर असतात. यामुळे हक्कांने शितल ताई म्हणून गोरगरीबांची हाक असते. सर्व सामान्य नागरिक आणि गोरगरीब जनता सरपंच शितल साखरे यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याने ताईंची ताकद वाढत आहे. तसेच या ताकदीच्या जोरावर आणि गावाच्या विकास कामांची थाप माजी आमदार अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित हे मारत असल्याचे दिसत आहे. तसेच दाखवलेला विश्वास पात्र ठरेल असे काम सरपंच शितल साखरे या करून दाखत आहेत. सरपंच शितल ताई साखरे यांचे कार्य खूप दमदार आहे. हे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातील सर्वांना माहीत आहे. 

विशेष म्हणजे सरपंच शितलताई साखरे या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित व गेवराई तालुक्याचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कट्टर समर्थक व जवळील विश्वासू सरपंच म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. गावातील कुठलीही प्रकारे समस्या असू द्या, ती समस्या सोडवण्यासाठी सरपंच शितलताई साखरे ह्या 24 तास गोरगरिबांच्या सेवेत उपलब्ध आहेत. माजी आमदार अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्या सरपंच म्हणून गावाचा विकास तसेच वेगवेगळे काम करतात अशा या महान तसेच विकास सम्राट सरपंच शितलताई साखरे यांची ओळख आहे.सरपंच शितलताई साखरे यांचा संघर्षाचा लढा गोरगरीब सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी आहे. घराला घरपण देणारी महिला आज सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असुन आता गावाला विकासात्मक शितलताई झाल्या सरपंच, सुधारला गावाचा प्रपंच!गावपण देणारी महिला ठरली आहे. संधी मिळालेल्या महिला सरपंच चांगले काम करुन गावास लौकीक मिळवुन देत आहेत.
 
•शुभम घोडके  (पत्रकार)
_________________________

0/Post a Comment/Comments