लिंबागणेश :- पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे मसेवाडी लघु सिंचन तलावाचा कालवा अंजनवती शिवारात फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असुन नुकसान भरपाईची मागणी करणा-या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याऐवजी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार बीड तालुक्यातील अंजनवती गावात घडला असुन यामुळे शेतकऱ्यांमध्ये तिव्र संतापाची भावना असुन संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारबाबत निवेदन देऊन झालेल्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील आणि सरपंच कैलास येडे यांनी दिला आहे.
विभागाची तक्रार केली म्हणून सुडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल :- कैलास येडे ( पिडीत शेतकरी)
मसेवाडी तलावातुन जास्तीचे पाणी सोडल्याने कालवा फुटुन माझ्या सिमला मिरचीचे नुकसान झाले असुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तक्रार दि.८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बीड, जा.पा.वि. क्रमांक ३ बीड केली होती. यामुळे सुबुद्धीने मी घटनास्थळी हजर नसतानाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरवर्षी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांच्या गलधान कारभारामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे.मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी लेखी तक्रारीकडे जणिवपुर्वक दुर्लक्ष करतात.
पाटबंधारे विभागाचे कर्मचारी नशेत असतात , शेत पिकांच्या नुकसानीबाबत जाब विचारला तर गुन्हा दाखल केला :- आशाबाई येडे ( पिडीत शेतकरी)
. माझे मालक पोट भरण्यासाठी गुजरात मध्ये गेलेले आहेत. मी माझ्या लेकराबाळा सोबत एकटीच शेती करते.दरवर्षी कालवा फुटुन आमच्या शेतीचे नुकसान होते. पाणी सोडणारे कर्मचारी नशेत असतेत. त्यांना वारंवार सांगुन ऐकत नाहीत. त्यादिवशी दारुच्या नशेत चिखलात पाण्यात पडले.आम्हाला दमदाटी केली आणि आमच्यावरच गुन्हे दाखल केलेत.अशी कैफियत आशाबाई गणेश येडे यांनी मा़डली.
पाटबंधारे विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे पाण्याचा अपव्यय,शेतीपिकांचे नुकसान ; आंदोलन उभारणार :- बाळासाहेब मोरे पाटील ( शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष )
गेल्या २०-२५ वर्षांपासून पाटबंधारे विभागाचा गलधान कारभार सुरू असुन कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. कालवा फुटल्याने ७५ टक्के पाणी गणेश नदी आणि शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होते.मी सटवाई देवी पाणी वापर संस्थेचा चेअरमन असुन सुद्धा गेल्या २५ वर्षात मला अथवा गावातील शेतकऱ्यांशी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधलेला नाही.शेतक-यांना विश्वासात घेतले जात नाही. पाटबंधारे विभागाच्या मनमानी कारभार विरोधात जिल्हाधिकारी बीड, पोलिस अधीक्षक बीड यांना भेटून निवेदन सादर करणार आहोत.पिडीत शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर रस्त्यावरची लढाई लढण्याचा ईशारा बाळासाहेब मोरे पाटील यांनी दिला आहे.
पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सोयरसुतक नाही :- कैलास येडे ( सरपंच अंजनवती)
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाल्याचे सोयरसुतक नाही. कैलास येडे यांच्या सिमला मिरचीचे नुकसान झाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वरीष्ठ आधिका-यांना फोनवरून कल्पना देऊन ३ तास वाट पाहिली परंतु आलेच नाहीत. तलावाची थातुरमातुर दुरुस्ती करून बिले उचलली जातात. पाणी सोडणारे कर्मचारी २४ तास नशेत असतात आणि पैसे घेऊन काम करत असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच कैलास येडे यांनी केली आहे. अशाच प्रकारे शेत पिकांच्या नुकसान झाल्याचे श्रीराम वारकरी, भास्कर येडे, स्वामी येडे, गणेश येडे, सत्यभामा येडे यांनी सांगितले.
_________________________
Post a Comment