आंबुलगा परिसरात अवैधरित्या देशी व विदेशी दारुची सर्रास विक्री

लोकनेता न्युज नेटवर्क

कंधार :- तालुक्यातील आंबुलगा परिसरात सकाळी ६ पासून अवैधरित्या देशी व विदेशी दारु सर्रासपणे विक्री करित आहेत,त्यामुळे मद्य शौकीनांचा सुळसुळाट चालू आहे,मद्याच्या नशेत भावी पिढी उद्ध्वस्त होत आहे,
त्यात अजून १८ वर्ष वय पूर्ण सुध्दा झालेले नाही,कि मिसूर्डे सुद्धा फुटलेले नाही.असे तरुण दारूच्या व्यसनेच्या आहारी जात आहेत.
      कंधार ते मुखेड आंबुलगा ते कळंका रस्त्यांवर दोन्ही बाजुने असलेले काही शेतकरी भाडयाच्या लालसेने आपले शेत पाडुन ठेवुन भाडयाने देत आहेत. त्यांना काही देणे घेणे नाही,आंबुलगा परिसरातील शेल्लाळी, सावरगाव (नि.), टोकवाडी याठिकाणी कसल्याही प्रकारची शासनाची परवानगी नसताना दारु विक्री करणारे ठांण मांडुन बसलेले आहेत,
       धाबेवाले खानावळीच्या नावाखाली अनाधिक्रत देशी विदेशी दारु विक्री करीत आहेत. यामुळे अनेक जणांचे संसाराची राखरांगोळी होत असुन संसार धुळीला मिळत आहेत,तसेच तरुण वर्ग व्यसनाधिन होत आहे,आणि घरी व गावात दारुच्या नशेत दारुडे वाद-विवाद करुन भांडण तटे करीत आहेत व शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत. तसेच त्यांच्या संसार उध्वस्त होत आहे,
       स्थानिक पातळीवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे होणारे दुर्लक्ष म्हणा किंवा आर्थिक संबंधांचा परिणाम, सकाळपासूनच परिसरात राजरोसपणे मद्याची विक्री केली जात आहे.सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारे स्थानिक पोलिस मात्र देशी दारू दुकानांविरोधात कारवाई करताना 'डगमगताना' दिसत आहेत.
      याकडे पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणां जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत,असे परिसरातील जनतेतून बोलल्या जात आहे,वेळीच अवैधरित्या दारु विक्री करणा-यावर व जमीन मालकावर कायदेशीर कारवाई होणार काय ? अशी जनतेत चर्चा होत आहे.

0/Post a Comment/Comments